Wednesday, September 25, 2019

" साम्राज्य धुक्याचे "

सूर्य सकाळी आज
उगवलाच नाही ।
साम्राज्य धुक्याचे
झाले दिशा दाही ।

आले भरून किती
आभाळ काळे काळे ।
प्रकाश झाला मंद
दिसेना आकाश निळे ।

धारा पावसाच्या
गेल्या येऊन चार ।
भिजला गुलाब चिंब
पाकळ्यांवर प्रहार ।
Sanjay R.

Tuesday, September 24, 2019

" काळोख दाटून आला "

झाले सारेच शांत
मन तरीही अशांत ।

शोधू कुठे तुला मी
क्षितिजास नाही अंत ।

लोपला सूर्य त्या कडेला
झाला प्रकाश निवांत ।

काळोख दाटून आला
नाही कुणास खंत ।

आकाश भरून आले
चांदण्या तिथे अनंत ।

हळूच मग चंद्र आला
होऊन एक संत ।
Sanjay R.

Saturday, September 21, 2019

" कुठे अग्नी कुठे चाक "

शोधले चाक मानवा
वेग प्रवासाला आला ।
शेकड्याने दूर अंतर
प्रवास क्षणाचा झाला ।

जळत होतो मनात किती
प्रवास आयुष्याचा झाला ।
अंत आला जवळ जेव्हा
बघा अग्नीचा जाळ झाला ।

कुठे अग्नी कुठे चाक
मनात कुठे उरला धाक ।
चकावरती प्रवास होतो
विझता अग्नी उरते राख ।
Sanjay R.

Friday, September 20, 2019

" न्हाई दिसत कावळा "

श्राद्धाचा मैना ह्या
न्हाई दिसत कावळा ।
मायबापाले तळपवलं
तुयासारखा तूच बावळा ।

कराची होती सेवा जवा
निस्ता खाल्ला तुन मेवा ।
मरून गेले तुया पायी
करशींन किती आता देवा ।

ल्हान जवा तू होता
केली किती तुयी फिकीर ।
तुया वानी गा औलाद झाली
चुकली किती हाताची लकीर ।

माय बाप देवावानी
थोडीशी तं कदर करा ।
मंग पायजा येईन कावळा
विच्छा त्यायची करन पुरा ।
Sanjay R.