का रे पावसा तुने
केला असा घात ।
सांग जरा यात
कुणाचा रे हात ।
सरला एक महिना
वाट तुझी पाहण्यात ।
करून पेरनी सारी
नाही काहीच शेतात ।
नजर लागली भिरभिर
ढग नाही आकाशात ।
चिंता सारीच आता
आली आसवं डोळ्यात ।
Sanjay R.
Friday, July 19, 2019
" केला पावसाने घात "
Thursday, July 18, 2019
" अंत पृथ्वीचा "
नसेल पिण्यास पाणी
होईल पृथ्वीचा अंत ।
पाण्यासाठी युद्ध
नसेल कुणास खंत ।
एकमेका मारतील
वाचविल कोण संत ।
विनाश सृष्टीचा होता
अंताचा होईल अंत ।
Sanjay R.
Wednesday, July 17, 2019
" हाल लय बेकार "
हाल लय आता बेकार
न्हाई पावसाले धार ।
काय अभायाचा इचार
खाली खाली दिशा चार ।
उनाचा झेलतो मी मार
पाहू कोनाचा अधार ।
अंतरात होते वार ।
करा मले तुमी सार ।
Sanjay R.
" का नशिबात गरीबी "
गरिबाला असतात कष्ट
सारेच कसे रे इथे दुष्ट ।
देवा मजवर का रे तू रुष्ट
सारेच तर इथे आहेत भ्रष्ट।
अन्नाचा काय महिमा
कुणी उपाशी
तर कुणी धष्टपुष्ट ।
नशीब माझेच का असे
उपसतो नुसतेच कष्ट ।
गरिबीचा कलंक माथी
स्वप्न झालीत लुप्त ।
देवा.....
नसेल मार्ग कुठलाच तर
टाक ना करून मला नष्ट ।
Sanjay R.
Tuesday, July 16, 2019
" गुरूपौर्णिमा "
चाले मनात ध्यास
गुरू माझा श्वास ।
ज्ञानी करून सोडिले
जीवनी तेचि प्रयास ।
गुरू विना मार्ग हा
असता गेला लयास ।
महिमा गुरूंची माझ्या
जाहले जीवन खास ।
अर्पितो चरणी गुरूंच्या
श्रद्धेची मी आरास ।
Sanjay R.