Sunday, July 14, 2019

" नको करू उजाड "

रूप कुणाचे
गुण कुणाचा
काय रे तू भाऊ ।
तुझ्या पेक्षा
सुंदर आमचा
काव काव काऊ  ।

सारेगम गातो कसा
ना  आवाज
ना तुला सूर ।
कोकीळ गाते
कुहू कुहू
तूच रे बेसूर ।

चिव चिव चिमणी
साद देऊनी
भुर्रकन उडे ।
डाव साधतो
कसा रे तू
करतो पुढे पुढे ।

हिरवा पोपट
पांढरे कबुतर
सारेच किती छान ।
जंगल झाडे
सरले आता
काय करू तुझे ज्ञान ।

लाव ना रे तू
एक एक झाड
नको करू उजाड ।
पडेल पाऊस
हिरवी सृष्टी
नदी नाले पहाड ।
Sanjay R.

Saturday, July 13, 2019

" पंढरीची वारी "

आलो करून मी वारी
झाले दर्शन रे तुझे हरी ।

गर्दी अमाप, फुलली पंढरी
मनी भाव भक्तीचा परी ।

मुखी चाले घोष पांडुरंग हरी
झालो पावन चंद्रभागेच्या तीरी।

दर्शनाचा हर्ष दाटला उरी
विठ्ठल विठ्ठल माझा हरी ।
Sanjay R.

Saturday, July 6, 2019

" भूक पोटाची "

कशाला रे देवा
दिलं मला हे पोट ।
स्वभावात माणसाच्या
त्यानच केली खोट ।

भरण्यासाठी पोट
कुणी करतो कष्ट ।
सरले विचारकी
होतो खूपच दुष्ट ।

करतो चोरी मारी
मारतो खिशावर डल्ला ।
नाती गोती विसरून सारी
करतो प्राणावरच हल्ला ।

अनाचार भ्रष्टाचार
सारेच खुले रस्ते ।
जीवन माणसाचं
झाले किती रे सस्ते ।

कशाला रे देवा
दिलं हे पोट ।
आपलेच दात आणि
आपलेच ओठ ।
Sanjay R.

Friday, July 5, 2019

" ढगांच्या आड "

ढगांच्या आड

किती रे तू लपशील ।।

घे थोडासा आराम

जिथे तू असशील ।।

Sanjay R.

Tuesday, July 2, 2019

" रे पावसा तू "

रे पावसा
बघायला लावतो तू वाट ।
पण तू
आहेस किती कसा रे छाट ।
कधी का असा
घेऊन येतोस तुफानी लाट ।
कधी करतोस
साऱ्यांनाच किती पिसाट ।
आलास खूप तर
रूप असते तुझे  विराट ।
पूर नदीला
रूप तुझे रे असते अफाट ।
नाही तर
सुरयासंगे रोजचीच पहाट ।
दुष्काळ पाचवीला
करतो सगळाच नायनाट ।
जास्त ना कमी
मात्र सुख दे भरमसाठ ।
Sanjay R.