Tuesday, June 25, 2019

" आयुष्य झाले रे पोळपाट "

नेहमीचेच झाले आता
लागते पेरणीची विल्हेवाट ।
झलक थोडी दाखवतो
पाहायला लावतो वाट ।
काय सांगावा कसा हा
मोसमी वाऱ्यांचा थाट ।
निळे निळे आभाळ सारे
ढग काळे लावतात काट ।
खिसा होतो रिकामा सारा
जीवनालाच लागलंय नाट ।
सांग बळी झेलतो कसा
आयुष्य तुझे रे पोळपाट ।
आशेवरच जगतोस तू
कधी उगवेल सुंदर पहाट ।
Sanjay R.

Monday, June 24, 2019

" पहिला पाऊस "

पहिल्या पावसाचे आज
थेंब चार  बघा पडले ।
रस्ता अंगण झाले ओले
ढगही थोडे गडगडले ।
गन्ध मातीचा सुटला
वारा बेधुंद झाला ।
समोरच घोळका मुलांचा
आनंदी कसा झाला ।
सळसळ झाली पानांची
वृक्ष लागले डोलाया ।
बरस रे अजून पावसा
मन मोर लागले नाचाया ।
Sanjay R.

" Yes I am "

My heart
Bits again and again....
Eyes are wachiing
Here and there....
Ears want to listen
A single word.....
You just say...
Yes I am....
Yes I am......
Sanjay R.

Friday, June 21, 2019

" योग डे "

आहे आज योगा डे
शरीर करायचं मागे पुढे ।
स्वस्थ शरीर , मन स्वस्थ
बघायचं थोडं स्वतः कडे ।
एकच दिवस पुरेल का
वेळच कुठे कोणा कडे ।
जगलो वाचलो चिंता नाही
पैसे मोजायचे डॉक्टर कडे ।
देव आठवायचे बेड वर
वाट दिसते मग मरणाकडे ।
नाही होणार एक दिवसात
रोज करायचा योगा पुढे ।
स्वस्थ शरीर मन निरोगी
चला करू या मागे पुढे ।
Sanjay R.

Thursday, June 20, 2019

" बाप "

माय माझे जीवन
बाप जीवनाचा आधार ।
राबतो घरासाठी
उचलतो सगळाच भार ।
माय लोण्याचा गोळा
बाप कठोर वाटे फार ।
झिजवी देह सारा
घराला कष्ट त्याचे अपार ।
होता तान्हुला बिमार
मायेला लागे आसवांची धार ।
ठेऊन दगड छातीवर
बाप निभवी सारे आचार ।
प्रसंग येता कसा कसा
बाप करी संकटाशी हात चार ।
आच हृदयात त्याच्या
परी चेहरा त्याचा निर्विकार ।
येता वादळ किती कशाचे
होई उभा तो होऊन दार ।
झाड वडाचे जसे तो
सांभाळी आपुला परिवार ।
Sanjay R.