Thursday, June 20, 2019

" बाप "

माय माझे जीवन
बाप जीवनाचा आधार ।
राबतो घरासाठी
उचलतो सगळाच भार ।
माय लोण्याचा गोळा
बाप कठोर वाटे फार ।
झिजवी देह सारा
घराला कष्ट त्याचे अपार ।
होता तान्हुला बिमार
मायेला लागे आसवांची धार ।
ठेऊन दगड छातीवर
बाप निभवी सारे आचार ।
प्रसंग येता कसा कसा
बाप करी संकटाशी हात चार ।
आच हृदयात त्याच्या
परी चेहरा त्याचा निर्विकार ।
येता वादळ किती कशाचे
होई उभा तो होऊन दार ।
झाड वडाचे जसे तो
सांभाळी आपुला परिवार ।
Sanjay R.

No comments: