तापतो सूर्य अजून ।
रोजच घेतो आम्ही
घामात चिंब भिजून ।
का अजून तू तळपतो ।
सारून आभाळ दूर
एकटाच असा मिरवतो ।
पावसास थोडे बरसू द्या ।
सुगन्ध या मातीचा
चहुओर थोडा पसरू द्या ।
हिरवळ ही सुकून गेली ।
बरस बरस रे मेघा तू
होऊ दे सारी धरा ओली ।
Sanjay R.


" आला पावसाया "
सात जून मने
पावसाचा दिस ।
कोठी गेले ढग
अभाय नियं निस ।
कवा येयीन पाऊस
जीवाले घोर ।
पेरनीचा हंगाम
जाईन का जोर ।
डोये लागले अभायाले
दिसत न्हाई काया टिपूस ।
जाईन का साल असच
होनार न्हाई कापूस ।
कसं होईन म्हायं
सावकार हाये मांग ।
हर साल तसच
न्हाई जीवनात रंग ।
पड ना बावा पावसा
लगन कऱ्याचं पोरीचं ।
लय नोको मले
पन देजो माया मेनतीचं ।
Sanjay R.
इतक्या मोठ्या आकाशात
एक छोटा पिटुकला ढग ।
पाडेल का हो पाऊस तो
भिजेल का त्याने सारे जग ।
धीर धर म्हणतात सारे
निघालेत म्हणे मोसमी वारे ।
रात्रीच तर पाहिलं मी
आकाशात होते सगळेच तारे ।
ये न रे आता पावसा
पोरं देतील तुला पैसा ।
खिसा माझा रे रिकामा
स्वप्न मात्र पाहतो दिवसा ।
Sanjay R.
स्वप्नांना कुठे काही
वेळ काळ असते ।
दिवस असो वा रात्र
मन त्यातच वसते ।
कधी आकाशात भरारी
कधी पाय नभावरी ।
समुद्राच्या लाटांमधून
वाट जाते इंद्राच्या दारी ।
दरबार इंद्राचा कसा
वाटला मज कसातरी ।
रंभा मेनका तिथल्या
त्याहून आपली वसुंधरा बरी ।
Sanjay R.
येतील का आज
पावसाच्या सरी ।
वाट तुझी पाहती
सारेच भीरी भीरी ।
कहर या गर्मीचा
सम्पव आता तरी ।
नक्षत्र जाइल लोटून
दे आभाळाची वारी ।
हट्टी किती रे तू पावसा
कोरड्या दिशा चारी ।
वेळ पेरणीची आता
नजर लागली तुझ्या वरी ।
माती पुकारते तुला
भिजव तिला थोडे तरी ।
गंध मातीला येऊ दे
लोट वाहू दे माझ्या दारी ।
Sanjay R.