हृदय मी जेव्हा तुला दिले
काटे गुलाबाचे गळून गेले
दरवळतो सुगंध आता
अंगण बघ कसे बेधुंद झाले ।
Sanjay R.
Friday, May 24, 2019
" काटे गळून गेले "
Thursday, May 23, 2019
" वाटे सुने सारे "
शोधतो तुलाच मी
वाटत
असावी तू शेजारी ।
तुझ्याविना सुने सारे
सांगतो
आहेस तूच अंतरी ।
हसणे तुझे रागावणे
वाटते
मजला किती भारी ।
तरी शोधतो तुलाच मी
अंतरातल्या
त्या दिशा चारी ।
Sanjay R.
" गोष्ट एक "
संगतो ना गोष्ट एक मी
तुह्या माह्या प्रेमाची ।
भाव लयच खात तू
पर हायेस लय गुणाची ।
राग तुया नाकावर पर
पेरमळ लय ओ मनाची ।
हायेस ना तू संग माह्या
फिकीर न्हाई मले कोनाची ।
जीव महा आता तुयात
जागल करजो माया प्रेमाची ।
Sanjay R.
Wednesday, May 22, 2019
" दाखवा टोला "
झाली निवडणूक
निकाल आता ।
पडलो जर तर
काय खाता ।
कोळसा झाला
चारा झाला ।
माल सगळाच
खिशात आला ।
रस्ते विकास
पाहिजे कुणाला ।
पाणी हवं आता
जगवा माणसाला ।
जमत नसेल तर
उचला झोला ।
मोदी राहुलला
दाखवा टोला ।
Sanjay R.
Tuesday, May 21, 2019
" प्रगटते गीता "
डोक्यात जेव्हा येते कविता
मनानं होतो मग मी रिता ।
शोधतो भाव शब्दांचा
प्रगटतात ओळी होऊन गीता ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)