Thursday, May 9, 2019

" असणं नसणं "

गोड तुझं हसणं
हळूच थोडं लाजण ।
मनाचा माझ्या ग
ठाव घेते तुझं बघणं ।
हवं हवसं वाटत मला
जवळ तुझं असणं ।
हुरहूर लावते मनाला
तुझं सोबत नसणं ।
Sanjay R.

" आवड निवड "

काय असेल माझी आवड
केली म्हणूनच ना तुझी निवड ।

नेहमीच असतेस किती बिझी
मिळायची केव्हा तुला सवड ।

बघ जीवाची किती होते परवड
चालते मनाची मग धडपड ।

निघावं वाटत घेऊन कावड 
कोमेजेनार नाही ना ही आवड ।
Sanjay R.

Sunday, May 5, 2019

" देखो सभी "

पुरा ना हो कभी
देखते सपना वह सभी ।
पाना है कुछ अगर
करो कोशीश फिर अभी ।
थोडे कष्ट थोडी मेहनत
न जाये व्यर्थ कभी ।
जिंदगी होगी रंगीन
खुशीयल होगे देखो सभी ।
Sanjay R.

Saturday, May 4, 2019

" काय हे जीवन "

काय हे जीवन
कसे हे जीवन  ।
बघायचं सारं
ठेऊन खुले नयन ।
डोकावलो आत तर
प्रश्न किती गहन ।
चालतांना इथे
करायचं सारं सहन ।
कुठे आनंद कुठे दुःख
प्रश्न पोटाचे भरण ।
स्वतःच जमवायचे
स्वतःसाठी सरण ।
शेवटाला मात्र
होते सारेच दहन ।
Sanjay R.

Friday, May 3, 2019

" खबर "

ना उनको है खबर
ना हमको है खबर ।
बात दिलकी हो जब
थोडा तो हो सबर ।
दिल दे आवाज जब
दिलको कहा खबर ।
आखे धुंडती तब
नहीं दिलको सबर ।
कुछ कहती है आखे
और हो जाता असर ।
ओठ ना कह पाते कुछ
बस सहता दिल ही असर ।
Sanjay R.