उन्हाचा जोर बघा
कमी झाला थोडा ।
आभाळानं वेढलं
सावलीचा सडा ।
बरं वाटत जरा
नाही सूर्याचा तिढा ।
गर्मी पाई तर होतो
माणूस चिडचिडा ।
Sanjay R.
Monday, April 22, 2019
" सूर्याचा तिढा "
" भाव मनातला "
तू आहेस माझ्या
मनातला भाव ।
मनाची माझ्या
तुझ्याकडे धाव ।
नको करुस तू
मनावर माझ्या घाव ।
ये ना सखे जवळ
प्रेमाला माझ्या प्रेम तू लाव ।
Sanjay R.
Sunday, April 21, 2019
" साद "
स्वप्नात तू देतेस साद
मिटले असतात डोळे तेव्हा ।
वाट तुझीच बघतो मी
सांग ना मज तू येशील केव्हा ।
भरून गेले काळीज माझे
आठवणींना सांग ठेऊ कुठे ।
नजरेला माझ्या आस तुझी ग
तुझ्याच साठी हे हृदय तुटे ।
Sanjay R.
" जिंदगी "
अकेले अकेले लहरोके संग
देखो ये हवा करती है तंग ।
उमड पडी दिलमे उमंग
चल उड चले अब संग संग ।
Sanjay R.
Saturday, April 20, 2019
" सूर्य चंद्र "
लागले ग्रहण सूर्याला
बघायचे मज चंद्राला ।
सळ सळ जरी वाहे तो
अस्तित्व कुठे वाऱ्याला ।
उमलला गुलाब अंगणात
डोलतो कसा डौलाने ।
धुंद झाले अंगण सारे
मंद धुंद सुगंधाने
स्वप्नच देतात साद मनाला
बंद असतात डोळे जेव्हा ।
अवतरतो मग सूर्य धरेवर
होते तांबडे आकाश तेव्हा ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)