नको करुस तू अबोला
सूर्यही पर्वता आड गेला ।
संध्या हळूच बघ आली
पक्षी निघाले घरट्याला ।
आभाळ झाले तांबडे
गेले आमंत्रण रात्रीला ।
चांदण्या फुलतील आकाशी
चंद्र लपला आडोशाला ।
अमावशेची रात्र बघ ही
येईल काजवा जगरणाला ।
Sanjay R.
नको करुस तू अबोला
सूर्यही पर्वता आड गेला ।
संध्या हळूच बघ आली
पक्षी निघाले घरट्याला ।
आभाळ झाले तांबडे
गेले आमंत्रण रात्रीला ।
चांदण्या फुलतील आकाशी
चंद्र लपला आडोशाला ।
अमावशेची रात्र बघ ही
येईल काजवा जगरणाला ।
Sanjay R.
मराठी नववर्षाचा दिवस आज
उभारून गुढी करायचा खास ।
शुभ आरंभ चला करू आपण
आता नवीन ध्येय नवा प्रवास ।
बांधा तोरण ध्वज उभारा
उम्मीद नवी ही भर श्वास ।
पाडवा म्हणा वा म्हणा मांडवस
विजयाचा आहे मनात ध्यास ।
Sanjay R.
स्वप्न माझे तूच
किती ग छळशील मला
भावना मनातल्या
का कळतील ग तुला ।
मन माझेही आतुर
मी सांगू कसे तुला ।
श्वास माझा तूच
सखे सांग ना ग मला ।
Sanjay R.
" पेव "
डराम कोठ्या नव्हत्या तवा
अनाज ठिवाले होते पेव ।
बिनधास्त राहे अनाज
उंदरा चिलटाच नव्हत भेव ।
दुष्काय जरी मंग पडला
राहे सोबतीले थोच देव ।
गावा गावात पहा आता
उरले नाही कुठंच पेव ।
राशन करडान चिंता गेली
दोन रुप्यात पोटभर जेव ।
काम धंदा सोडून सन्या
सरकारलेच अखिन शिव्या देय ।
Sanjay R.
हार गुलाबाचे टाकून
करू आम्ही स्वागत ।
देशद्रोह करा तुम्ही
पाजू देशभक्तीचे रगत ।
कायदाच नसेल आता
बसा सगळेच बघत ।
Sanjay R.