Friday, April 5, 2019

" सांग ना "

स्वप्न माझे तूच
किती ग छळशील मला
भावना मनातल्या
का कळतील ग तुला ।

मन माझेही आतुर
मी सांगू कसे तुला ।
श्वास माझा तूच
सखे सांग ना ग मला ।
Sanjay R.

Thursday, April 4, 2019

" पेव "

" पेव "

डराम कोठ्या नव्हत्या तवा
अनाज ठिवाले होते पेव ।

बिनधास्त राहे अनाज
उंदरा चिलटाच नव्हत भेव ।

दुष्काय जरी मंग पडला
राहे सोबतीले थोच देव ।

गावा गावात पहा आता
उरले नाही कुठंच पेव ।

राशन करडान चिंता गेली
दोन रुप्यात पोटभर जेव ।

काम धंदा सोडून सन्या
सरकारलेच अखिन शिव्या देय ।
Sanjay R.

Wednesday, April 3, 2019

" द्रोह "

हार गुलाबाचे टाकून
करू आम्ही स्वागत ।
देशद्रोह करा तुम्ही
पाजू देशभक्तीचे रगत ।
कायदाच नसेल आता
बसा सगळेच बघत ।
Sanjay R.

Tuesday, April 2, 2019

" भोळी चारोळी "

चार ओळींची चारोळी
दिसते थोडी भोळी ।
पण आहे शब्दांचे जाळे
लावून बसलेला कोळी ।
जरा बघा तिचे इशारे
पडेल अपुरी ती झोळी ।
भावनांचा वाचे पाढा
मनाची करते खेळी ।
Sanjay R.

Sunday, March 31, 2019

" मागणं "

जीवन हेच
एक रडगाणं ।
नको वाटे ते
रडकं जिणं ।
थोडं हसणं
थोडं रुसणं ।
सहजच सरेल
हसत जगणं ।
देवापाशी माझं
काय मागण !
बदलून टाक
साऱ्यांचं वागणं ।
Sanjay R.