Friday, March 29, 2019

" आभाळ रिते "

भावनांचा हा वेग किती
विचारांचा आवेग किती ।

मनात बघ वादळ किती
अंतरात सळसळ किती ।

सर एक पावसाची येता
परडी आभाळाची रीती ।
Sanjay R.

Wednesday, March 27, 2019

" काय कसे "

काय लिहावे,कसे लिहावे,
न शब्द सुचे मजला....
आठवण तुझी होताच क्षणी,
शोधतात डोळे तुजला....

नसतेस ना तू तिथे
शोधतो मी तुला जिथे ....
मिटतो डोळे मी मग
असतेस तू अंतरात इथे....

तुझ्या वीना सांग मी कसा
आहेस तू माझा श्वास जसा...
आयुष्यभर असेल सोबत
घेतला मी तर हाच वसा....
Sanjay R.

Saturday, March 23, 2019

" काहूर "

वाटेवर तुझ्या मी
मीही किती आतुर ।
बघ सखे आलोच मी
मनात माझ्याही काहूर ।
अंतरात तू माझ्या
नाहीस तू फार दूर ।
लावू नकोस अशी तू
हृदयास हूर हूर ।
घे पुसून आसवे थोडी
नको अणु पापणीत पूर ।
मन माझे तुटते किती
करू नकोस चुर चुर ।
Sanjay R.

" आधार "

मन विचारांचे भंडार
किती पेलायचा तो भार ।
ओळी होतील चार पण
शब्दच सांगतील सार ।
त्यात कवितेचा आकार
मग उघडे अंतराचे दार ।
कधी वाटे तेचि प्रहार
परी जीवनाचा आधार ।
Sanjay R.

Friday, March 22, 2019

" हूर हूर "

मना लागे हूर हूर
सांग तू किती दूर ।
आठवण तुझी येत
मन होते आतुर ।
डोळे शोधतात तुला
येई पापणीत पूर ।
Sanjay R.