Friday, March 8, 2019

" करू किती गुण गान "

कोमळ मनाचे पान
आहेस किती छान ।

घराची तू आन
तूच कुटुंबाची शान ।

सागरा इतके ज्ञान
कर्तृत्वात विज्ञान ।

आई ची माया
बहिणीची छाया  ।

अर्धांगिनीचे आहे
तुजला  किती भान ।

अंबा तू जगदंबा तू
देवतेचे तूच निशाण ।

झाशीची राणी तू
कृष्णाची राधा तू ।

विचारांची तू खाण ।
किर्ती तुझीच महान ।

रूप तुझे गं हजार
करू किती मी गुणगान ।

वंदन करतो तुज पूजितो
तूच आमुचा सन्मान ।
Sanjay R.

Thursday, March 7, 2019

" अशीच एक सायंकाळ "

अशीच एक सायंकाळ
पक्षी निघाले घराला ।
मावळतीच्या सूर्याने
तांबडे केले आकाशाला ।
हळूच डोकावून बघते रात्र
निमंत्रण गेले अंधाराला ।
चांदणी शोधते चंद्र
येईल कसा तो अमावसेला ।
हिरमुसली चांदणी मनात
उरलेत दिवस किती पौर्णिमेला ।
Sanjay R.

Wednesday, March 6, 2019

" आठवण "

जे जे असेल मनात तुझ्या
सारंच दे तू ओंजळीत माझ्या ।
स्वप्न सारी तुझी नि माझी
जपून ठेवील अंतरात माझ्या ।
असतील तारे दूर जरी फार
सांगतील तुलाच आठवणी माझ्या ।
Sanjay R.

Tuesday, March 5, 2019

" परतून परत जगायचं "

गालात थोडं हसायचं
गुलाबासारखच फुलायचं ।
वाटलंच फार तर रुसायचं
क्षणात फिरून हसायचं ।
हास्य राखून थोडं गालावर
आनंदात छान दिसायचं ।
सुखद किती हा झुळझुळ वारा
सोबत त्याच्या थोडं झुलायचं ।
अथांग हे आकाश किती
मनसोक्त त्यात फिरायचं ।
हृदय हे कोमळ किती
अलगद त्यात शिरायचं ।
अनमोल हे जीवन किती
परतून परत जगायचं ।
Sanjay R.

Monday, March 4, 2019

" तनहाई "

अनजान था वो
फिर भी  लगे पहचान पुरानी ।
हसता था जब वह
लगे यह तो मेरी ही कहानी ।
न जाने  कब खो गयी
यादोमे उसके हुई मै दिवानी ।
निंद मेरी उसने चुराई
ख्वाबमे भी थी उसकी परछाई ।
देखती हु बस उसिको
छोड गयी मुझे अब मेरी तनहाई ।
Sanjay R.