Monday, March 4, 2019

" रे मना "

मना मना
सांग रे मला ।
मनातलं माझ्या
कळलं का तुला ।
भरलय गच्च आभाळ
सांगू मी कुणाला ।
भरभरून वाहू दे 
डोळ्यातल्या थेंबाला ।
होईल रितं सारं मग
नसेल कुणी बघायला ।
Sanjay R.

Sunday, March 3, 2019

2 रे वर्हाडी संमेलन

आइकत का भौ
सांगतो तुले गोठ ।
सम्मेलन वऱ्हाडीच हाये
तारीख सात आन आठ ।
मैना ठिवजो लक्षात
एपरील चा थाट ।
जाच अकोल्याले
पहाची न्हाई वाट ।
दुरून दुरून यइन
वरहंड्यायची लाट ।
तयारी जरा पायजा
सारेच पडीन चाट ।
Sanjay R.

Thursday, February 28, 2019

" मराठी भाषा दिन "

लिहितो वाचतो
मी कुणासाठी
माय मराठी
मी माझ्यासाठी ।
अस्तित्व माझे
कुणासाठी
माय मराठी
तुझ्यासाठी ।
अभिमान मज
मराठीचा
मराठी माझी
माझ्यासाठी ।
Sanjay R.

Wednesday, February 27, 2019

" लय झाली अमिरी "

लय झाली अमिरी
थोडी गरिबी बी पहा ।
झोपडीत गाड्याच्या
जाऊन थोडं राहा ।

न्हाई बसाले पाट
न्हाई झोपाले खाट ।
जिकडं पहान तिकडं
ठिगळायचा थाट ।

बिमार बुढी कोपऱ्यात
न्हाई औषीध पानी ।
जिरून गेली जागीच
कायजी कोनाले कानीं ।

नागडे पुगडे लेकरं खेयते
भुके पाई रडते भारी ।
कामासाठी धनी कसा
फिरते दारोदारी ।

शिक्षन पानी लेकरायचं
खिशात न्हाई खडकू ।
लक्षुमी त्याची रडते
मानते गुमान ऱ्हावा
नका अशे भडकू ।

पाच पन्नास कमाई त्याची
काय काय थो करन ।
रातच्याले साथरीवर
पायते थो मरन ।

सरनाले बी त्याच्या
लाकडं कसे भेटन ।
पाला पाचोया जमवून
सांगा देह कसा पेटंन ।

मुन मनतो गडया .....

लय झाली अमिरी
थोडी गरिबी बी पहा ।
झोपडीत गाड्याच्या
जाऊन थोडं राहा ।
Sanjay Ronghe
Nagpur

Tuesday, February 26, 2019

" झटका पाकिस्तानले "

पाकिस्तान ले बापू
आज दावला इंगा ।
सांगून ठिवतो
घेऊ नका पंगा  ।
कश्मीर मंदी
लय झाला दंगा  ।
घरात घुसून
कसा केला नंगा ।
झोंबली का न्हाई
लवकर सांगा ।
Sanjay R.