Wednesday, January 30, 2019

" बासरीचे सूर "

तुझ्या बासरीचे सूर
मन होते रे आतुर ।
लागे किती हूर हूर
नको होऊस तू दुर ।
अंतरात उठे काहूर
येई आसवांचा पूर ।
फुटतो किती हा उर
शोधते तुझाच सूर ।
Sanjay R.

" ओंजळ रीती "

कशी ग तू विसरलीस
वाट बघतोय मी तुझी किती ।
येशील माझ्या स्वप्नात म्हणून
जागून काढतो रात्री किती ।
ये ना आजही स्वप्नात माझ्या
देईल तुलाच मी माझी प्रीती ।
जाऊ नकोस सोडून परत
तुजविण माझी ओंजळ रीती ।
Sanjay R.

Sunday, January 27, 2019

" तू कशी "

स्वतःलाच मी विचारतो
असशील तू कशी ।
सांगत अंतरमन माझं
असणार तू तशी ।
गोड  तु हसावं आणि
व्हावी मला खुशी ।
विचार तुझा यावा नी
समोर दिसावी तू जशी ।
अतूट ते नाते किती
सोबत कपाला बशी ।
Sanjay R.

Saturday, January 26, 2019

" आभाळ आलं "

दडला सूर्य
आभाळ आलं ।
वातावरण ही
थंड झालं ।
पडला पाऊस
अंगण ओलं ।
विचारी मन
चिंब झालं ।
Sanjay R.

Friday, January 25, 2019

" फॅशन "

" फॅशन  "

काय तुही फॅशन
जसं रोज नवं ठेसन ।
गाडी चाले रुळावर
पर नवीन एक मिशन ।
तोरा किती कसा
तोंडाले लोशन ।
फिकीर बी न्हाई
हासत कोनी आसन ।
करू द्या करते त
मनात जे असन ।
नाईत रुसुन जाऊन
कोपरयात  बसन ।
दिसच फिरले आता
पायजेल फॅशन ।
नसलं काई खाले
तरीबी चालन ।
Sanjay R.