स्वतःलाच मी विचारतो
असशील तू कशी ।
सांगत अंतरमन माझं
असणार तू तशी ।
गोड तु हसावं आणि
व्हावी मला खुशी ।
विचार तुझा यावा नी
समोर दिसावी तू जशी ।
अतूट ते नाते किती
सोबत कपाला बशी ।
Sanjay R.
Thursday, January 24, 2019
" विचार "
Wednesday, January 23, 2019
" वाटतं मलाही "
आपलं म्हणावं असं
कुणीतरी असावं ।
त्यांनीही माझ्यावर
थोड्या रागानं रुसवं ।
अतीच राग आला तर
खळखळून हसावं ।
चार गोष्टी प्रेमाच्या
अंतरातून बोलावं ।
आवडता माझा तू
कानात येऊन सांगावं ।
मलाही वाटत मनातून
मनसोक्त पावसात नाचाव ।
कुणीतरी आपलं ना
मलाही असावं ।
Sanjay R.
Tuesday, January 22, 2019
" तुलाच शोधतो मी "
तुलाच शोधतो मी
कशी ही सांज झाली ।
घराला निघाले पक्षी
चांदणी आकाशी आली ।
दडला सूर्य पल्याड
चंद्र हसला गाली ।
चमचमला काजवा आणि
धरा अंधार ल्याली ।
टीमटीमते दूर पणती
मंदिरात घंटा झाली ।
रस्ते सुनसान झाले
रात्र अवचित आली ।
रात राणी माझी ग तू
सु गंधात न्हाली ।
Sanjay R.
Monday, January 21, 2019
" स्वप्न माझे "
रात्री आज ना
आघटीतच घडलं ।
झोपेत मला ना
एक स्वप्नच पडलं ।
मोठा मोठा खूप मोठा
पर्वता आड मी दडलो ।
छोटीशी गारगोटी
त्यावर जाऊन पडलो ।
आई आई करून
किती हो मी रडलो ।
कष्ट तिचेच ना
जोही आहे तो घडलो ।
विसरेल कसा बाबांना
त्यांच्याच बाळानं उडलो ।
त्यांच्याविना मी आज
स्वप्नातही तडफडलो ।
Sanjay R.
" ओळख पाळख "
साहित्यीक वयख पायख लेखमाला ३६🤝
" माह्या वऱ्हाडाची माती "
माह्या वऱ्हाडाची माती
फुलवते सारी नाती गोती ।
धनी राबतो थे शेती
होतो वला पावसाच्या घाती ।
पऱ्हाटीले फुटते पाती
वळे कष्टाच्या वाती ।
तवा येयी पयसा हाती
पोसे मानसाच्या जाती ।
घास दोन सारे खाती
कधी उपासाच्या राती ।
तुटे निसर्गाची गती
हाती ढेकलाची माती ।
दिस हपत्याचे साती
जीव उरफाटा घेती ।
अभंग तुकोबाचा गाती
फुले इंच इंच छाती ।
सपन उद्याचे पायतो
झोप सुखाची राती ।
व-हाडी बोलीभाषेवर प्रेम करनारे संजय रोंघे BE(Elect)MBA असुन पन आपल्या रोजच्या जगन्या वागन्यात व-हाडीपना संभावुन हाय! .. ईंजिनियर असलेला हा मानुस तसा नागपुरचा पन नोकरी मातरं यवतमाळले ! यवतमाळच्या रेमंड फ्याक्टरीत म्यानेजरची नोकरी संभावुन, संजुभौ साहित्यीक म्हनुन तं जगतेतचं ! पन संगच वावरावर बी ध्यान देतेतं ,एक कास्तकार असल्यानं त्यातलं सुख अन दुख आपल्या कवीताईतं मांडुन आनंद घेतेत अन देतेत ... संजुभौ समाजासेवेत पन मांग नाईत ,अळल्या नळल्याले मदत करत असतेतं,त्याईच्या सुखातचं आपलं सुख पायनं हे त्याईले बेज्या आनंद देते .बातम्या आईकनं ,शिनमे पायनं ,टेक्नालॉजी ,डिस्कवरी ,नवं नवीन शोध यात बेज्या इंटरेस्ट असलेला मानुस !
👉सोशल माध्यमातु साहित्याचा प्रचार अन प्रसार ...
👉सहभाग -९२वे अ . भा . म . सा . संमेलन यवतमाळ
👉सदस्य - अखिल भारतीय व-हाडी साहित्य मंच.
अशा हुरहुन्नरी अन मानसाईत मानुस पायना-या संजुभौले सुखी ,समाधानी ,निकोप अन निरोगी जिंदगानीच्या रेमंडभर शुभेच्छा ....💐💐✌🏻
तं मंग सकाय अनखीन भेटु एका नव्या वयखी पायखी संग ....
धन्यवाद 🙏🏻
✍🏻
श्याम ठक
अध्यक्ष
अखिल भारतीय व-हाडी साहित्य मंच
९९७५७९२५२०
abvsmakola@gmail.com
@SHYAM2473
shyamthak.blogspot.in/?m=1