Monday, January 21, 2019

" ओळख पाळख "

साहित्यीक वयख पायख लेखमाला ३६🤝

" माह्या वऱ्हाडाची माती "

माह्या वऱ्हाडाची माती
फुलवते सारी नाती गोती ।

धनी राबतो थे शेती
होतो वला पावसाच्या घाती ।

पऱ्हाटीले फुटते पाती
वळे कष्टाच्या वाती ।

तवा येयी पयसा हाती
पोसे मानसाच्या जाती ।

घास दोन सारे खाती
कधी उपासाच्या राती ।

तुटे निसर्गाची गती
हाती ढेकलाची माती ।

दिस हपत्याचे साती
जीव उरफाटा घेती ।

अभंग तुकोबाचा गाती
फुले इंच इंच छाती ।

सपन उद्याचे पायतो
झोप सुखाची राती ।

व-हाडी बोलीभाषेवर प्रेम करनारे संजय रोंघे BE(Elect)MBA असुन पन आपल्या रोजच्या जगन्या वागन्यात व-हाडीपना संभावुन हाय! .. ईंजिनियर असलेला हा मानुस तसा नागपुरचा पन नोकरी मातरं यवतमाळले ! यवतमाळच्या रेमंड फ्याक्टरीत म्यानेजरची नोकरी संभावुन, संजुभौ साहित्यीक म्हनुन तं जगतेतचं ! पन संगच वावरावर बी ध्यान देतेतं ,एक कास्तकार असल्यानं त्यातलं सुख अन दुख आपल्या कवीताईतं मांडुन आनंद घेतेत अन देतेत  ... संजुभौ समाजासेवेत पन मांग नाईत ,अळल्या नळल्याले मदत करत असतेतं,त्याईच्या सुखातचं आपलं सुख पायनं हे त्याईले बेज्या आनंद देते .बातम्या आईकनं ,शिनमे पायनं ,टेक्नालॉजी ,डिस्कवरी ,नवं नवीन शोध यात बेज्या इंटरेस्ट असलेला मानुस !
👉सोशल माध्यमातु साहित्याचा प्रचार अन प्रसार ...
👉सहभाग -९२वे अ . भा . म . सा . संमेलन यवतमाळ
👉सदस्य - अखिल भारतीय व-हाडी साहित्य मंच.
अशा हुरहुन्नरी अन मानसाईत मानुस पायना-या संजुभौले सुखी ,समाधानी ,निकोप अन निरोगी जिंदगानीच्या रेमंडभर शुभेच्छा ....💐💐✌🏻
तं मंग सकाय अनखीन भेटु एका नव्या वयखी पायखी संग ....
धन्यवाद 🙏🏻
✍🏻
श्याम ठक
अध्यक्ष
अखिल भारतीय व-हाडी साहित्य मंच
९९७५७९२५२०
abvsmakola@gmail.com
@SHYAM2473
shyamthak.blogspot.in/?m=1

No comments: