Sunday, January 6, 2019

" किती ही थंडी "

किती ही थंडी
होते उलार बंडी ।
थरथरते अंग
गुल होते दांडी ।
वाटे प्यावा गरम चहा
पडतात रुपये दहा ।
लाकडं किती जाळायची
झाडं होताहेत स्वाहा ।
कडाका थंडीचा कसा
वाटे अति भारी ।
मी मी म्हणणारी बघा
कापताहेत सारी ।
नकोच वाटते थंडी
होते उलार बंडी ।
होत नाही सहन
दाखवा लाल झंडी ।
Sanjay R.

Sunday, December 30, 2018

" विचार "

असेच काही तरी
विचार येतात मनात ।
शब्द रूपानं अवतरतात
काव्य होऊन पानात ।
Sanjay R.

Friday, December 28, 2018

" जिंदगी क्या है तू "

देखी जब तस्वीर उनकी ।
न जाने दिलको क्या हुवा ।
खो गये तस्वीरमे और लगा
जिंदगी है आग और हम धुवा ।

हर कदम हर वक्त बस
जलते रहे हम ।
ना आखो मे असू
ना दिल मे गम ।
फिरभी लागता
जिंदगीमे कुछ तो है कम ।

रास्ता लंबा कितना
चालते राहना है अब ।
सुख दुःख तो साथी है
पर कोई न होगा तब ।
Sanjay R.

" इयर एन्ड "

सरले हे वर्ष आता
मनात बरेच उरले ।
झाले किती पूर्ण आता
निश्चय जे जे धरले ।
जिकण्याचे स्वप्न होते
परी तेचि हरले ।
वर्षाचे दिवस किती
मोजून पूर्ण भरले ।
अजूनही मन हे रिते
ठाव कुणास किती उरले ।
जगायचे आनंदात अजून
निश्चय मनाशीच ठरले ।
Sanjay R.

Thursday, December 27, 2018

" नका विचारू वय "

प्रश्न एक भारी
ग वय काय पोरी ।
म्हणू नका काकू
उत्तर मिळेल सॉरी ।
मी नाही काकू
यंगच मी नारी ।
झाले थोडी जाड पण
वळून बघतात सारी ।
बघ जरा तिकडे
दुसरी कोणी म्हातारी ।
मी तर आहे अजूनही
इंद्राघरची परी ।
परत नको करुस
असली चौकशी सारी ।
वय कुणी सांगतं का
फालतूचिंच हुशारी ।
Sanjay R.