Monday, December 3, 2018

" रंग जीवनाचा "

आनंदच तर आहे
जीवनाचा आधार ।

वाटणार नाही न मग
आयुष्य एक भार ।

सुख दुःखाच्या वाटेवर
रोज करायचे प्रहार ।

त्यातूनच शोधायचे
उत्साहाचे बहार ।

भिजून जायचं त्यातच
हाच जगण्याचा एक सार ।

जन्म मृत्त्यूच्या प्रवासाची
वाट होईल अशीच मग पार ।
Sanjay R.



Sunday, December 2, 2018

" बी हॅप्पी "

सहजच बघितला आज
संग्रह तुझ्या फोटोंचा ।
अपुरे पडताहेत शब्द
महिमा तुझ्या सौंदर्याचा ।

मला पण वाटतो हेवा तुझ्या
तुझ्या खळखळणार्या हास्याचा ।
तुझ्या सवे मीही हसावं
क्षण न क्षण व्हावा आनंदाचा ।
Sanjay R.

Friday, November 30, 2018

" रात्र "

अंधार होताच रात्रीचा
लागतात इथे पहारे ।
एका चंद्रासाठी जागती
रात्रभर अगणित सितारे ।
झाडांची मग चाले कुजबुज
सळसळ वाहती वारे ।
रातराणीचा उठता दरवळ
होई बेधुंद अंगण सारे ।
मधेच काजवा चमचम करता
गगनात हसती तारे ।
उधाण येते आकाशाला
काय कुणाचे इशारे ।
Sanjay R.


Sunday, November 25, 2018

" देव देवायचा देव "

देव देवायचा देव
येई मानसाले चेव ।
मानुस मने त्याले
सुखी मले ठेव ।
लय करिन मी पापं
नाही मले मंग भेव ।
संग माया तू हाये
महा वाला रे देव ।
देव देवायचा देव
म्होरं चार आने ठेव ।
सांग गाऱ्हाणं त्याले
निवद म्हना तू जेव ।
लागते मले लय
भरू दे माहा पेव ।
किरपा मायावर कर
हायेस ना रे तू देव ।
करू नको कोप कंदी
मले सुखी तू बापा ठेव ।
सांभायजो मले देवा
बुची नारयाची तू ठेव ।
Sanjay R



Saturday, November 17, 2018

" गार गार वारा "

होतोय थंड आता
सूर्याचा पारा
पहाटेला असतो
गार गार वारा
रात्र काळोखी
चमचमता तारा
सूर्य किरणांनी नटतो
आसमंत सारा
फुलून मोगरा
करतो इशारा
दरवळतो सुगंध
खुलतो पिसारा
Sanjay R.