Friday, November 30, 2018

" रात्र "

अंधार होताच रात्रीचा
लागतात इथे पहारे ।
एका चंद्रासाठी जागती
रात्रभर अगणित सितारे ।
झाडांची मग चाले कुजबुज
सळसळ वाहती वारे ।
रातराणीचा उठता दरवळ
होई बेधुंद अंगण सारे ।
मधेच काजवा चमचम करता
गगनात हसती तारे ।
उधाण येते आकाशाला
काय कुणाचे इशारे ।
Sanjay R.


No comments: