Sunday, November 25, 2018

" देव देवायचा देव "

देव देवायचा देव
येई मानसाले चेव ।
मानुस मने त्याले
सुखी मले ठेव ।
लय करिन मी पापं
नाही मले मंग भेव ।
संग माया तू हाये
महा वाला रे देव ।
देव देवायचा देव
म्होरं चार आने ठेव ।
सांग गाऱ्हाणं त्याले
निवद म्हना तू जेव ।
लागते मले लय
भरू दे माहा पेव ।
किरपा मायावर कर
हायेस ना रे तू देव ।
करू नको कोप कंदी
मले सुखी तू बापा ठेव ।
सांभायजो मले देवा
बुची नारयाची तू ठेव ।
Sanjay R



Saturday, November 17, 2018

" गार गार वारा "

होतोय थंड आता
सूर्याचा पारा
पहाटेला असतो
गार गार वारा
रात्र काळोखी
चमचमता तारा
सूर्य किरणांनी नटतो
आसमंत सारा
फुलून मोगरा
करतो इशारा
दरवळतो सुगंध
खुलतो पिसारा
Sanjay R.


Thursday, November 15, 2018

" निघायचं का प्रवासाला "

बसून बसून जाणवतो थकवा
शीण आला दिमाखाला ।
विचारांचं जाळं मोठं किती
लागतं काय त्यात गुरफटायला ।

भूतकाळाच्या आठवणी अनेक
लागतो कधी उलगडायला ।
त्यातच मग गुंफून घेतो
नसतं कोणी सोडवायला ।

दिवसा मागून दिवस जातात
वेळच नसतो जगायला ।
दिवस अंताचा येऊन ठेपतो
जातो कसा मग मरायला ।
Sanjay R.



Saturday, November 10, 2018

" बळी सांगा हो कुठला राजा "

बळी सांगा आता कुठला राजा
भोगतोय बिचारा कसली सजा ।

सरकारही लुटत आहे त्यासी
व्यापारी मापारी करताहेत मजा ।

फेकतात पैसे किती घ्यायला पिझा
शेतकऱ्याच्या मालाला भाव खुजा ।

फटका संसार त्याचा काय कसली माजा
लटकतो फासावर पाहून कर्जाचा बोजा ।
Sanjay R.

Friday, November 9, 2018

" दिवाळीचे चार दिवस "

दिवाळीचे दिवस चार
तुडुंब भरला बाजार ।
पैसे पैसा एकच विचार
फाटक्या खिशाला लागली धार ।
चिवडा लाडू फटाके अनार
नवीन साडी आणि विजार ।
दग दग सारी थकलो फार
उचलत नाही आता भार ।
धड धड फुटले फटाके चार
सरली दिवाळी नैय्या पार ।
एकत्र आला सारा परिवार
आनंदात न्हालो हाच सार ।
Sanjay R.