Friday, November 2, 2018

" श्वास कसा घ्यायचा "


जिकडे तिकडे धुरांचे लोट
श्वास घ्यायचा, कसा ते सांगा
पेट्रोल डिझेलचे वाढलेत भाव
तरीही पंपावर मोठमोठ्या रांगा

धुरच धूर केला जिकडे तिकडे
झाला आहे आता आयुष्याचा पंगा
गाडीत टाकून स्वस्त रॉकेल
निसर्गाशी करताहेत किती हो दंगा

ढीग कचऱ्याचे दिले पेटवून सारे
तांडव धुराचा सुरु आहे सारा
एक एक श्वास जीव घेतोय आता
माणूसच माणसावर करत आहे मारा
Sanjay R.



Tuesday, October 30, 2018

" दिवाळी "

गरिबा घरी असते हो
रोजच दिवाळी ।

फाटकं घालूनच मिरवायचं
त्यात कसली नव्हाळी ।

गोड धोड कुठलं काय
पोटावर द्यायची टाळी ।

चमचमती रात्रही
जाते अशीच काळी ।

आनंद तुमचाच बघून
गालावर उमलते खळी ।

फटाक्यांच्या आवाजानं
बसते कानठळी ।

दोष नशिबाचा
अंतराला जाळी ।

गरिबा घरी असते हो
रोजच दिवाळी ।

संजय रोंघे , नागपूर


Saturday, October 27, 2018

" सासुरवास "

मनात एक आभास
स्वप्नातही सासूच खास
असेल कसा सासुरवास
मनातही चाले ध्यास
कधी वाटायचं
नकोच तो प्रवास
होईल जीवनाचा नाश
बघता बघता आली सासू
म्हणाली गं पोरी
थोडी तर हास
लेक माझीच तू
तुटले सारे फास
आनंदानं बघा आता
घेते मी श्वास
Sanjay R.


" निर्मिती या विधात्याची "

रचले का हे ब्रह्मांड विधात्याने
असेल काय मनात त्याच्या ?
गुरफटली हि धरा सारी
फेऱ्यात जन्म आणि मृत्यूच्या

शोधू चला माझ्यातला मी
शोध तुही तुझ्यातला तू
त्यातच गवसेल कधीतरी
अर्थ एक या निर्मितीचा
Sanjay R.



Thursday, October 25, 2018

" कौन हु मै "

कौन हु मै जनता नही
गलत क्या, क्या है सही ।
कहता तो इंसान हु मै फिर
इंसानियत कहां खो गयी ।
Sanjay R.