Tuesday, October 30, 2018

" दिवाळी "

गरिबा घरी असते हो
रोजच दिवाळी ।

फाटकं घालूनच मिरवायचं
त्यात कसली नव्हाळी ।

गोड धोड कुठलं काय
पोटावर द्यायची टाळी ।

चमचमती रात्रही
जाते अशीच काळी ।

आनंद तुमचाच बघून
गालावर उमलते खळी ।

फटाक्यांच्या आवाजानं
बसते कानठळी ।

दोष नशिबाचा
अंतराला जाळी ।

गरिबा घरी असते हो
रोजच दिवाळी ।

संजय रोंघे , नागपूर


No comments: