Wednesday, October 24, 2018

" नाही भीती मरणाची "

प्रत्येकाला घाई इतकी
लागली ओढ पुढे जायची

कागदोपत्रीच उरलेत आता
ऐसी तैसी नियमांची

पालन कुणीच करणार नाहीत
जवाबदारी शासनाची

अपुरे पडतायेत रस्ते
चिंता फक्त वेळेची

बेलगाम वागणे आमचे
फुरसत नाही क्षणाची

आई बाप बायको पोरं
शोधतील लाकडं सारणाची

शॉर्टकट सदा डोक्यात
नाही भीती मरणाची
Sanjay R.







No comments: