Tuesday, September 25, 2018

" गळफास "

मिळुन स्वातंत्र्य आम्हास

झालो स्वतंत्र आम्ही जरी ।

मोजू नका हो दिवस

लोटलेत वर्ष कितीतरी ।


करुनी संशोधन अपार

पोचलो आम्ही मंगळा वरी ।

तरी लक्ष कुणाचे आहे

जगतो पारतंत्र्यात शेतकरी ।


रात्रंदिवस मरेस्तो राबतो

एकही दाना नाही घरी ।

वाट पाहतो चातक होऊन

पडतील कधी पावसाच्या सरी ।


बी बियाणे खते औषधे

होतो असाच कर्जबाजारी ।

एकच पाऊस देतो धोका

गाळून पडते मेहेनत सारी ।


कुणास काय जगतो कसा

किंमत शून्य आहे सरकारी ।

घेऊन गळफास लटकतो जेव्हा

करता करविता तोच हरी ।

Sanjay R.

Monday, September 24, 2018

" दिवस हरवून गेले "

सहजच उलगडता आयुष्याची पाने
आज का कसे आठवण देऊन गेले ।

जन्मापासूनचा तो इतिहास पहा
ते दिवसच कुठे हरवून गेले ।

मातीच्या भिंती त्याला कवलांचे छत
घर म्हणायचो ज्याला ते पडूनच गेले ।

अंगणात असायची बाग आणी बागेत फुलं
परसातली तुळसही सूकूनच गेली ।

गडबड गोंधळ, चाले मुलांचा कल्लोळ
सगळीकडे आता शांत शांत झाले ।

कंचे विटी दांडू धापाधुपी लपाछपी
कसे किती ते खेळ सारे लुप्त झाले ।

आपल्याच धुंदीत डोळे फोडून बघा आता
मोबाईल साऱ्यांच्या हाती आले ।

ऊन थंडी पाऊस वारा नी वेचायच्या गारा
बसल्या जागेवर आता शीण येतो सारा ।

अंतर असो कितीही पायी पायी चालायचे
लपून छापून कधी सायकलवर बसायचे ।

गॅस कुकर पंखा एसी बसायला सोफा
नव्हते यातले काहीच, पाटावरच बसायचे ।

दंगा मस्ती, गप्पा गोष्टी, आनंद सारा
सारेच कसे मोठमोठ्याने हसायचे ।

बालविहार गीतमाला रेडिओ आकाशवाणी
आरामात बसून कान लावून ऐकायचे ।

सारच संपलं आता, गेले जुने दिवस
सांगेल का कोणी काय आता सरस ।
Sanjay R.

Sunday, September 23, 2018

" आसाराम "

राम रहीम आसाराम
इनका है एकही काम ।
जो भी है लुटो सारा
भरो झोली लेकरं दाम ।
Sanjay R.

Friday, September 21, 2018

" सरन "

जगता जगता येते मरन
जमवून ठिवजा लागन सरन ।
यमदूत लय झालेत
सांभायून रायजा बा
नाहीत येऊन कोनिबी धरन ।
Sanjay R.

" दो शब्द "

आज तो कान भी
तरस रहे थे
सुनने को तुम्हारे
दो शब्द ।
बस तस्वीर देखते रहे
और खो गये
तुम्हांरी आखोमे ।
Sanjay R.