Monday, August 27, 2018

" जिंदगी "

खोना न चाहु तुम्हे 
हो तुम मेरी जिंदगी ।
दिन एक और मिल जाये
जी लुंगा मै जिंदगी ।

कभी हसता कभी रोता हू
यही तो है यह जिंदगी ।
कभी आसू कभी गम फिरभी
लगती कम यह जिंदगी ।

ख्वाहिशें है हजारो दिलमे
वक्त नाही जिनेको जिंदगी ।
निंदमे भी पिछा करती
सपनो भरी यह जिंदगी ।

आओ जीले दिन कुछ और
कर ले हसीन यह जिंदगी ।
मीले ना मिले दोबारा फिर
चल साथ मेरे हे जिंदगी ।
Sanjay R.


Sunday, August 26, 2018

" बांधते मी राखी "

" माझ्या भारत भूमीच्या सीमेवरील रक्षण कर्त्या सैनिकांना समर्पित या चार ओळी "

भारतभुच्या हे सैनिका
घेतले व्रत तू देशसेवेचे ।

म्हणून  बघतो आम्ही
दिवस हे सुख समाधानाचे ।

सांग मज ऋण तुझे
आम्ही कसे ते फेडायचे ।

बांधते आज राखी तुज
भाग्य हे आम्हा बहिणींचे ।
Sanjay R.

Saturday, August 25, 2018

" देखो जरा इधर "

ना हारना ना तुटना
हसीन है ये जिंदगी ।
देखो तो जरा इधर
लाये है हम बंदगी ।
आखो मे देखो जरा
दिखेगी तुम्हे जिंदगी ।
आओ पास जरा तो
होगी साथ बंदगी ।
Sanjay R.

Friday, August 24, 2018

" जायचं का पावसात "

सखे दे हातात हात
होऊ दे मस्त बरसात ।
पौर्णिमेची चांदणी रात
तुझी आणि माझी साथ ।
जायचं का पावसात
काय तुझ्या मनात ।
बघ माझ्या डोळ्यात
सांग माझ्या कानात ।
Sanjay R.

Wednesday, August 22, 2018

" भावनांचा कल्लोळ "

मनात भावनांचा कल्लोळ
सारा विचारांचा घोळ

जशी अंतरात जाळपोळ
डोळ्याला आसवांचे ओघळ

कुठे कुणाची हळहळ
दिसे कुठे तळमळ

देखावाच जास्त
भासे त्यात सळसळ

सरलेत झरे निर्मळ
घाला शुद्धीची आंघोळ

तोडा स्वार्थाचा मंगळ
होईल जीवनात चंगळ
Sanjay R.