Tuesday, July 10, 2018

" पाऊसच पाऊस "

कसा हो हा पाऊस
पड पड म्हटलं तर पडत नाही ।

आणी पडलाच तर
थोडीही उसंत देत नाही ।

कोरड्या नद्या कोरडे नाले
नावही पैलतीरी नेत नाही ।

आलाच कधी तर
जीव घेतल्या शिवाय जात नाही ।

रिमझिम रिमझिम कोसळेल असा
नदी की नाली काळतच नाही ।

खूप तु रे बरसला
आता विचार कर काही ।

सूर्य कूठे असेल
सारे शोधताहेत दिशा दाही ।

उघड थोडं दार
साऱ्यांचीच झाली त्रेधा तिरपट त्राही  ।

थांब थोडा आता
सांगून जा तू , परत येणार कि नाही ।
Sanjay R.


Sunday, July 8, 2018

" चाला वारीले जाऊ "

चालतं का गा भाऊ
वारी ले जाऊ ।

डोये भरून विठ्ठलाले
याची देही पाऊ ।

वरकऱ्याच्या संग संग
काही दिस राहू ।

जय हरी विठ्ठलाचे
भजन थोडे गाऊ ।

चंद्रभागेच्या पाण्यामंदी
एक दिस न्हाऊ ।

आषाढी एकादशीले
पंढरीतच राहू ।

माऊलीच्या दर्शनान
धन्य आपुन होऊ ।

चाल न गा भाऊ
वारी ले आपुन जाऊ ।
Sanjay R.

Friday, July 6, 2018

" स्वातंत्र्य "

हे स्वातंत्र्य  विरांनो
किंमत कुणास तुमच्या बलिदानाची ।

उरला इथे स्वैराचार
हीच गोष्ट इथे अभिमानाची ।

गांधी नेहेरु टिळक भगतसिंग
थोर लेकरं तुम्ही या भूमातेची ।

स्वातंत्र्याचे स्वप्न तुमचे
आग लागली पारतंत्र्याची ।

गीत गाता राष्ट्र गाण
वाटे तिरंगा आम्हा महान ।

नाही उरले सारे सरले
बघा किती आता झालो लहान ।

राजकारणात हा देश नासला
आता चिंता उरली खुर्चीची ।

मान सन्मान नाही इमान
वाटे त्यातच त्यांना शान ।

भेद भाव जाती वाद
पेटत आहे सगळे रान ।

मारणे मारणे रोजचेच झाले
करून सोडले इथे स्मशान ।
Sanjay R.

" टाळ मृदंग "

टाळ वाजे चिपळीसंग
थाप घेई मृदंग

पायी बंधूनीया चाळ
नाचतसे संत संग

वारीचा अवघाची रंग
मनी पंढरीचा चंग

कीर्तनाच्या रंगी होतसे दंग
मुखी सारे गाती अभंग

करी गजर नामाचा
डोले सारे अंग

ओढ माऊलीच्या प्रेमाची
मग होईल कशी ती भंग
Sanjay R.


Thursday, July 5, 2018

" पंढरीची वाट "

पाऊले चालली पंढरीची वाट l
ना कसला मोह ना कसला थाट l

घेऊन चालती हातात चिपळ्या l
हरिनामाचा गजर अन् वाजवित टाळ्या l

पायात नसे वहाणा पण डोईवर तुळस l
खांद्यावर पताका त्यात नसे आळस l

मुखी तुम्ही सारे बोला हरी बोला l
  माऊलीच्या ओढीने लगबगीने चला l

नाचत गात होती कसे गुंग l
  पांडुरंगाच्या ओढीने सारे कसे बेधुंद l

एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंध l
नाही कोणी चेला नाही कोणी संत l
Sanjay R.