बघता बघता आज पाऊस आला
उष्ण वारा गार झाला ।
थोड्याच वेळात पावर गेला
सगळीकडे अंधार झाला ।
ढगांचाही गडगडाट झाला
आनंद सगळ्यांना अफाट झाला ।
नभा आड सूर्य बाद झाला
झाडा झुडपात ही प्राण आला ।
Sanjay R.
Tuesday, June 5, 2018
गडगडाट
एक ढग तू
फक्त एकदा
वळुन थोडं बघ तू ।
सुंदर हे आकाश
त्यातलाच एक ढग तू ।
आसुसले सारेच इथे
दे एक थेंब तू ।
फुलेल हसेल धारा सारी
बदल सारे जीवन तू ।
थेंबे थेंबे साचेल तळे
सागराचा कण तू ।
वाऱ्या सांगे बरस थोडा
ओल्या मातीचा सुगंध तू ।
Sanjay R.
Sunday, June 3, 2018
सहज जाता जाता
सहजच सरळ जाता जाता
तिरक्या नजरेनं बाजूला बघायचं
कोण बघतेय आपल्याला
जाणुन थोडं फुलायचं ।
सहजच सरळ जाता जाता
खाली थोडं बघायचं
धोंडे माती रस्ता कसा तो
संभाळूनच थोडं चालायचं ।
सहज सरळ जाता जाता
वर आकाशात थोडं बघायचं
गर्दी ढगांची बघून
चालण्याच्या गतीला थोडं वाढवायचं ।
सहज सरळ जाता जाता
वळून मागे नाही बघायचं
भुतकाळ मागे सारा
पुढे अजून पुढेच बघायचं ।
सहज सरळ जाता जाता
विचारात नाही गुफटायच
भविष्याचा गढ उंचच उंच
शिखरावर जाऊन पोचायचं ।
Sanjay R.
Thursday, May 31, 2018
कृष्ण सावळा
काळा काळा
कृष्ण सावळा
मागे गोपिकांचा मेळा
मानमोहना तू रे
लाविला साऱ्यासी लळा
एक राधा ती
प्रेम फुलले अंतरात
तिज भासे तू निळा
फुलला बहरला मळा
सूर बासरीचे तुझ्या
तृप्तीचा आनंद वेगळा
Sanjay R.
Friday, May 18, 2018
मी वर्हाडी
" मी वर्हाडी "
वाट्ते ना भाऊ मलेबी
वऱ्हाडीचा अभिमान।
वऱ्हाडात जलमलोना
मुनच हाये मले साभिमान ।
लयच झालना का भौ
घेतो मी बी देवाची आन ।
साधाच मानुस मी
नको मले बापू मान पान ।
नसन ना हुशार मी
तरी हाये मले सारंच ग्यान ।
तुया इतलाच आसन मी
नको समजू मले ल्हान ।
जास्त नाई पर सांगतो तुले
लय फिरलो मी रान न रान ।
आरशात बी पाऊनच हावो
ठीक ठाकच हाये महा वान ।
कंदी मंदी पूजा बी करतो
देतो गरीबायले थोडं दान ।
बोललं कोनी का मंग ना
सुटते आपलंबी मंग भान ।
वरहाडाची मातीच अशी
काळी मुलायम लोण्यावानी छान ।
Sanjay R.