Friday, May 18, 2018

मी वर्हाडी

" मी वर्हाडी "

वाट्ते ना भाऊ मलेबी
वऱ्हाडीचा अभिमान।

वऱ्हाडात जलमलोना
मुनच हाये मले साभिमान ।

लयच झालना का भौ
घेतो मी बी देवाची आन ।

साधाच मानुस मी
नको मले बापू मान पान ।

नसन ना हुशार मी
तरी हाये मले सारंच ग्यान ।

तुया इतलाच आसन मी
नको समजू मले ल्हान ।

जास्त नाई पर सांगतो तुले
लय फिरलो मी रान न रान ।

आरशात बी पाऊनच हावो
ठीक ठाकच हाये महा वान ।

कंदी मंदी पूजा बी करतो
देतो गरीबायले थोडं दान ।

बोललं कोनी का मंग ना
सुटते आपलंबी मंग भान ।

वरहाडाची मातीच अशी
काळी मुलायम लोण्यावानी छान ।
Sanjay R.

No comments: