Saturday, March 10, 2018

महिला दिन

चला घेउ या आन
द्यायचा महिलांना सम्मान
पुसुन टाकायचे सारे
पुराणातले अज्ञान
स्त्रीचा मान
पुरुषाची शान
प्रगती पथावर जायचे
सोबतीला असेल विज्ञान
चला घेउ या आन
S. Ronghe

Thursday, March 1, 2018

" रंगाचा मेळ "

जिवन रंगांचाच खेळ
सुख दुखा:चा त्यात मेळ
हसत हसत जगा नाहीतर
हळुच संपेल ही वेळ
© Sanjay R.

" पेटवु एकदाच होळी "

पेटवायची आज होळी
चला निघु या घेऊन झोळी ।

मरे तोवर राबतो कसा
काळ्या मातीत रे बळी ।

घामा रक्ताने तुझ्यारे
झाली ओली माती काळी ।

काळजीनं लेका तुझ्या
पडली गालावर खळी ।

नाही तमा कुणा सरकारी
पडल्या पोटाच्या वळी ।

उपाशी पोट रे तुझे
व्यापारी भाजतो त्यावर पोळी ।

लेकरं तुझी रे राजा
कोरडीच वाजवतात टाळी ।

येयील कधी किव तुझी
फोड रे तु आता किंकाळी ।

नको झेलुस घाव आता
टाक पेटवून एकदाच होळी ।

लाकडंही नको ठेवु बाकी
कळेल सार्यासी मग दिवाळी ।
© Sanjay R.

Wednesday, February 28, 2018

" नारी तुझा मान "

अगं नारी काय तुझा मान
करु किती कसा तुझा मी सन्मान ।

जगताची तु आहेस माता
ममत्व आहे तुझीच शान ।

ज्ञानाचा तु आहे सागर
गाउ किती सांग तुझे मी गुणगान ।

कधी माता तर कधी होतेस सखी
संगीनी ,अर्धांगिनी भुमिका तुझ्या महान ।

तलवार हाती घेउनी लढतेस
शुर विरांच्या गाथेतले
आहेस अद्वैत पान ।

कधी अंबा कधी जगदंबा
दैत्यांचे तुची मिटवी निशान ।

काळानुसार बदलसी रुप
तिनही लोकी आहे तुच महान ।

संसार रथाचे चाकही तुच
सुखी संसारासी तुझेच वरदान ।

परी सोसते तिर निष्ठुरांचे
सारेच आहेत अजुनही अजान  ।

पुजनिय तु, मी वंदन करतो
तुजविण आम्हा काय कसला अभिमान ।

आसवांत मी तुझ्या शोधतो
कुठे हरवला माझाच मी प्राण ।
© Sanjay R.

Saturday, February 24, 2018

" दरवळ "

कुणास ठाउक आज
मोगरा फुलला नाही ।

सुगंधही कुणास ठाउक
आज दरवळला नाही ।

प्रियकरानं प्रेयसीला
गुलाबही दिला नाही ।

गोड गुलाबी चेहरा तिचा
आज हसला नाही ।

थेंब डोळ्यातला आसवाचा
का कुणास कळला नाही ।
© Sanjay R.