Thursday, March 1, 2018

" पेटवु एकदाच होळी "

पेटवायची आज होळी
चला निघु या घेऊन झोळी ।

मरे तोवर राबतो कसा
काळ्या मातीत रे बळी ।

घामा रक्ताने तुझ्यारे
झाली ओली माती काळी ।

काळजीनं लेका तुझ्या
पडली गालावर खळी ।

नाही तमा कुणा सरकारी
पडल्या पोटाच्या वळी ।

उपाशी पोट रे तुझे
व्यापारी भाजतो त्यावर पोळी ।

लेकरं तुझी रे राजा
कोरडीच वाजवतात टाळी ।

येयील कधी किव तुझी
फोड रे तु आता किंकाळी ।

नको झेलुस घाव आता
टाक पेटवून एकदाच होळी ।

लाकडंही नको ठेवु बाकी
कळेल सार्यासी मग दिवाळी ।
© Sanjay R.

No comments: