Thursday, February 1, 2018

" घाव काट्याचे "

अंतराच्या पटलावर
लिहिले नाव मी प्रेमाचे ।

हसतो तो गुलाब अजूनही
कळले असेल का त्यास मनाचे ।

वाटते भिती कधी कधी
भळभळेल रक्त घाव काट्याचे ।

पाकळ्या तर तिथेच फुलतात
करु काय मी या दिलाचे ।

फुलतो मोगरा झाडावर परी
देतो दरवळ क्षण आनंदाचे ।
©Sanjay R.

" चंद्र ग्रहण "

लागलं चंद्राला
ग्रहण आज ।
उतरला चमचमणारा
त्याचा साज ।

खुलली चांदणी
हसली गालात ।
अंधाराला दिली
आज तिने मात ।

मिरवेल सुर्यही
होता उद्या प्रभात ।
तुटेल कशी तिघांची
जन्मोजन्मीची साथ ।

विटाळला माणुस
धरेला आघात ।
अंतराळातले चक्र
दिवस आणी रात
© Sanjay R.

Thursday, January 25, 2018

91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बडोदा... निमंत्रण

91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बडोदा...
कवी कट्टा आयोजन समितीचा आज मला मिळालेला ई-मेल...

- संजय रोंघे ...

" थोडी स्पेस "

खांद्यावरी झुलले छान
काळे भोर तुझे केस ।

सौंदर्यानं खुलला कसा
गोड तुझा गं फेस ।

कपाळी कोर चंद्राची
डोळ्यात भावनांची लेस ।

केलेस घर मनात माझ्या
शोधतो त्यातच थोडी स्पेस ।
Sanjay R.

Wednesday, January 24, 2018

" संपलं आता रडू "

आता लेखणी नकोच
हवा एक खडु ।
विसरा म्हणावं सारं
संपलय सारं रडू

का लेखता तुम्ही
स्त्रीस इतके कमी ।
सरला तो काळ
आज बरोबरीची हमी ।

का विसरलेत सारे
ती झासीची राणी ।
लढते तशिच आजही
पुसुन डोळ्यातले पाणी ।

संसाराचा ओढुन गाडा
घरास देई घरपण ।
नका पाहु अंत तिचा
होइल तुमचेच सरपण ।

सार्या जगाची माता ती
प्रेमळ तिचेच मन ।
फिटणार नाही जन्मात या
कधी मोजलेस का ते रुण ।
Sanjay R.