मित्रांनो कालच्या दैनिक तरुण भारतला आसमंत पुरवणित प्रकाशित माझी कविता " आसवं ". संपादकांचे खुप खुप आभार .
दिनांक 21.01.2018
Monday, January 22, 2018
" आसवं "
Tuesday, January 16, 2018
Monday, January 15, 2018
" पाउस आसवांचा "
अंतरात आहे सागर
सुख आणी दु:खाचा ।
शब्दच शोधतात वाट
थांग लागेना मनाचा ।
शब्द शब्द एकच पुरे
तुटतो धागा काळजाचा ।
होउनी थेंब डोळ्यावाटे
लोटतो पुर आसवांचा ।
आनंदाचा क्षणही भारी
पडे पाउस आसवांचा ।
सुखावतो सांगु किती
कोपरा एक अंतराचा ।
Sanjay R.
"गोड गोड बोला "
तिळगुळाची ना
चवच किती न्यारी ।
गोड बोलणं का
इतकं भारी ।
शब्दच शब्दांना
जपतात ना जरी ।
अंतरात विचारांना
जपा थोडं तरी ।
शब्दांनिच जुळतात
नाती किती तरी ।
आनंदी जिवनाचा
मंत्र ओठांच्या दारी ।
Sanjay R.
Friday, January 12, 2018
" काय तुझ्या मनात "
काय तुझ्या मनात
सांग माझ्या कानात ।
नाकात नथनी
कानात डुल ।
घे ना गं पोरी
गुलाबाचं फुल ।
डोळ्यात काजळ
ओठाला लाली ।
गुलाब फुलला
तुझ्या गं गाली ।
कपाळी बिंदी
केसात गजरा ।
मुखडा तुझा गं
सोन्याहुन साजरा ।
गालावर हसु नी
नजरेत बाण ।
दिसतेस किती गं
पोरी तु छान ।
नाजुक बांधा
अंगावर शालू ।
वाटतय किती गं
तुझ्याशी मी बोलु ।
रंभा तुच की
मेनका गं तु ।
इंद्रपुरीची की
अप्सरा गं तु ।
डोळ्यात बसली
मनात ठसली ।
विचारात तुझ्या गं
आठवण फसली ।
काय तुझ्या मनात
सांग माझ्या कानात ।
Sanjay R.