Friday, December 1, 2017

" खळी "

" चारोळी "
बघुन गालावर खळी तुझ्या
भान माझे हरपले ।
मनात बहरली कळी माझ्या
काटे गुलाबाचे करपले ।
Sanjay R.

" गंध प्रीतीचा "

रुप माझे मलाच
कळले नाही अजुन ।
दाखविले आरशाने मज
मन लाजरे आहे अजून ।
सजले नटले मी परी
नाही हसले मी अजुन ।
गंध प्रीतीचा माझ्या तुज
का कळला नाही अजुन ।
Sanjay R.

" करु नको पहाट "

बघायची कीती वाट
आली आसवांची लाट ।

गळ्यात दाटला हुंदका
अंतरी विचार अफाट ।

काळी भोर झाली रात्र
पसरला अंधार दाट ।

फुलव सख्या आता
मोगरा माझ्या अंगणात ।

आठवणीत तुझ्या रे
झाले मन माझे सैराट ।

ये ये रे सख्या आता
करु नकोस तु पहाट ।
Sanjay R.

Monday, November 27, 2017

" साथ "

एक अनजानीसी
थी वह रात ।
चांदनी की
चांदसे मुलाकात ।
लीये थे दोनो
हातोमे हात ।
चांदने कही 
दिलकी बात ।
कितना अतुट
दोनोका साथ ।
Sanjay R.

Friday, November 24, 2017

" तुम हो परी "

कुछ बाते खयालो मे
कुछ वादे खयालो मे
दिल और दिल
खयालो मे ।

थोडा प्यार
थोडा गुस्सा
तेरे गुलाबी गालोमे ।

समंदर सी गहराई
देखी मैने
तेरी आखोमे ।

एक हसीन परछाई
कुछ खोई खोई
देखता हु सपनेमे ।

वही हो तुम परी
चाहु जब भी मै
देखता तुझे आइनेमे
Sanay R.