Wednesday, November 8, 2017

" अंगाई "

बाळा तुज गाउ
कशी रे मी अंगाई ।
विशाल या अंगणी
करते गाई गाई ।
उपवाशी तु
उपवाशी तुझी आई ।
भुकेचा हा डोंगर
का तुझ्याच ठाई ।
Sanjay R.

Friday, October 27, 2017

" पेटते चुल "

संसार फाटका
काखेत मुल ।
घालुन फुंकर
पेटते चुल ।
डोळ्यात आसवं
विचारांना हुल ।
दिवस रात्र
भुकेला भुल ।
स्वप्नात बघते
नवी एक चाहुल ।
गुलाब फुलवतो
काट्यात फुल ।
Sanjay R.

Thursday, October 26, 2017

" हवा मला नवाब "

लहानगींनं केला साज
म्हणते कशी मी
दिसते कशी आज .
साडीत ती
दिसते लाजवाब .
ऐट तिची बघा
दिसतो खास रुबाब .
म्हणते कशी आता
हवा मला नवाब .
लहान लहान मुलं ना
नाही त्यांचा जवाब .
Sanjay R.

Wednesday, October 25, 2017

लेक लाडी

लेक निघाली माहेरा
चेहरा झाला हसरा.
मन झाले वादळ वारा
डोळ्यात मायेचा झरा.

आई बापाची लेक लाडी
आठवांनी झाली वेडी.
भाऊ बहीन पाहती वाट
ठेविली घेउन तिज साडी.
Sanjay R.

Saturday, October 21, 2017

दिवाली

चलो आज कुछ
गीत गुनगुनाते है
दिवाली के पटाखोकी
आवाज सुनाते है .
खुशी का यह त्योहार बडा
कुछ मिठाइ खिलाते है .
झगमग झगमग रंग रंगोली
आकाशसे हम तारे लाते है .
नइ उमंगे  नइ आशा
आवो एक दिप जलाते है .
मिलकर हम सब
खुशीया मनाते है .
Sanjay R.