आभाळाला लाउन बसला
बळीराजा आपला डोळा ।
आकाशातल्या ढगांमधे
शोधतो तो ढग काळा ।
हिरमुसलेली शेतं बघुन
हुंदक्याने दाटला गळा ।
विखुरताहेत स्वप्न सारी
निघाली आसवं घळघळा ।
Sanjay R.
Thursday, August 17, 2017
आभाळ
Monday, August 14, 2017
नंद लाला
गोपाला गोपाला
तु गिरीधर लाला ।
क्रिष्ण कन्हैय्या तु
देवकी नंद लाला ।
आवडीचे तुझ्या
दही दुध लोणी ।
गोपीकांचा लाडका
नसेल इतका कोणी ।
मैत्रीची मिसाल तु
मित्र तुझा सुदामा ।
संपला दुष्ट तो
कपटी कंस मामा ।
सुर बासरीचे ऐकुन
होइ वेडी ती राधा ।
अर्जुनाचा सारथी तु
महाभारताचा विधाता ।
Sanjay R.
फाटका संसार
मोठे किती
हे घर आमचे ।
खाली धरती
वर आकाश ।
आडोशाला
आहेत दगड ।
पाउस पाण्याची
नाही चिंता ।
फाटका संसार
जिवनाची व्यथा ।
पोटाची भुक
जळती गाथा ।
Sanjay R.
Tuesday, August 8, 2017
" आनंद "
मैत्रीचा एक हात
सार्या जिवनाची साथ ।
चढ उतार जिवनातले
करुन त्यावर मात ।
जगायचं सारं आयुष्य
रोज नवी प्रभात ।
जावं लागेल सोडुन
कधी एक क्षणात ।
तोवर हसायचं
खुप खुप आनंदात ।
Sanjay R.
Thursday, August 3, 2017
" मनच जळलं "
कसं कुणास ठाउक
पण आज कळलं
माणसाचं ना
मनच जळलं ।
माणसांनी माणसांना
किती छळलं ।
माणुसकी बघुन
सारं जग हळहळलं ।
माणसाचं ना
मनच जळलं ।
वाटलं होतं
संकट टळलं ।
आलेलं तुफान
मागच्या मागे वळलं ।
विचारांचं आवरण
कित्ती मळलं ।
माणसाचं ना
मनच जळलं ।
Sanjay R.