Saturday, June 24, 2017

" मनाचे द्वंद "

मनात चालले द्वंद
नाही मजला ठाव ।
लागला एक छंद
कसा  हा मनातला भाव ।

हास्य बघुन तुझे मज
वाटे सोबत तुझ्या हसावे ।
नजरेस देउनी नजर
डोळ्यात तुझ्या बघावे ।

रात्रंदिवस तासन तास
हितगुज तुजशी करावे ।
एक एक क्षण आठवणींचा
हृदयात त्यासी जपावे ।

फुल एक गुलाबाचे
केसांत तुझ्या माळावे ।
हातात घेउनी हात
थोडे तुलाच छळावे ।

तुझे माझे गुफुनी श्वास
एकरुप असे व्हावे ।
निशीगंधेच्या सु गंधात
बेधुंद होउनी गावे ।
Sanjay R.

Thursday, June 22, 2017

" आला होता पाउस राती "

आला होता पाउस राती
जमन वाटते आता शेती ।

वाटे आठ दिस झाले आता
खर्च पेरनीचा जाइन मातीत ।

पानीच धावला  गावावर पावला
बरं झालं बावा भिजली माती ।

देव आसन तीथं पंढरपुरी पन
जगाची दोरी मातर त्यच्याच हाती ।
Sanjay R.

Tuesday, June 20, 2017

" मला पण पाउस व्हायचं "

होउनी ढगांवरती स्वार
आकाश भ्रमणाला मज जायचं ।
मला पण आहे पाउस व्हायचं

अचानक येउन तुज कडकडुन भेटायचं
मनात तुझ्या डोकाउन हळुच छळायचं
मला पण आहे पाउस व्हायचं ।

बेधुंद होउन खुप खुप बरसायचं
हळु हळु छान चिंब तुला भिजवायचं
मला पण आहे पाउस व्हायचं ।

केसांमधुन गालावर हळुच खाली ओघळायचं
श्वासातला श्वास होउन कुशीत तुझ्या शिरायचं
मला पण आहे पाउस व्हायचं ।

गोड गुलाबी फुल होउन स्वप्नातनं तुज जागवायचं
गीत पावसाचे सोबतीनं तुझ्या आहे मज गायचं
मला पण आहे पाउस व्हायचं ।
Sanjay R.

" क्षण हासरा "

लाल तुझा शालु
केसात मोगरा ।
चेहर्यावरी भाव
आहे कीती लाजरा ।
नजरेत तुझ्या मी
शोधतो क्षण हासरा ।
माझे मलाच वाटे
विसरावे तुझ्यात जरा ।
Sanjay R.

Thursday, June 15, 2017

" बघतो मी तुझीच वाट "

बघतो मी
तुझीच वाट ।
मनात कीती
घातले घाट ।
वेळेचा मात्र
अलगच थाट ।
साराच उलटला
मनातला पाट ।
तरीही अजुन
मी बघतो वाट ।
येयील एक
आठवणीची लाट ।
सुर्य उदयाला
होइल ना पहाट ।
Sanjay R.