Wednesday, June 7, 2017

" माझी प्रकाशीत कविता "

दैनिक तरुण भारत आसमंत पुरवणीत प्रकाशीत माझी कविता ।
दिनांक 04.06.2017
संपादकांचे खुप खुप धन्यवाद ।

Tuesday, June 6, 2017

" सर पावसाची "

लागले डोळे आकाशाला
शोधायचे दुर आभाळाला ।
काळ्या ढगांना बोलवायाला
थेंब पाण्याचा मागायाला  ।
धरा हिरवी फुलायाला
जिवन परत हसायाला ।
वार्या संगे डोलायाला
छत्री रेनकोट उघडायाला ।
आसुसली नजर खुलायाला
पावसाच्या सरीत भिजायाला ।
Sanjay R.

Tuesday, May 30, 2017

" तेरी अदा "

चाहत है ये मेरी
इशारोमे सही
इशारा तु दे ।
नजरो को मेरी
एक नजर तु दे ।
ओठो पे हसी तेरे
थोडी मुस्कुराहट दे ।
हर अदापे मर मिटु
वह इजाजत मुझे दे ।
बाहोमे तेरी खो जाउ
थोडी जगा मुझे दे ।
Sanjay R.

Monday, May 29, 2017

" मस्ती गोंधळ सारच सरलं "

लहान असतांना आम्ही
काय चालायची मस्ती ।
धांगड धिंगा मारापीटी
आरडा ओरड नुसती ।

कधी चाले कंचे गोट्या
कधी चाले विटी दांडु ।
लपाछपी धापा धुपी
तर कधी होइ बॅट चेंडु ।

शुर विरांची लढाइ चाले
घेउन हाती स्केल छत्ते ।
उन्हात आईचा नकार येता
घरातच चाले कॅरम पत्ते ।

मस्ती गोंधळ सारच सरलं
मोबाइल वरती खेळ आता ।
अभ्यास पुस्तक जाड झाले
नाही उरला वेळ आता  ।
Sanjay R.


Thursday, May 25, 2017

" लाव तु जिव थोडासा "

असा कसा रे तु माणसा
नको वाटे तुज लेक लाडाची ।
नको करुस असा फरक
देइल तुज सावली झाडाची  ।

गर्भातच तीचा करीशी अंत
कसा होशील रे तु निवांत ।
जन्मा आधीच घालवतो तु
का मनानं होशील तु शांत ।

भेद मुला मुलीचा का करीशी
माया करील कोण तुझशी ।
आसवं पुसाया येयील ती
रडेलही तीच घेउन तुज उशाशी ।

नको लोटुस असा रे तीला
आहे प्रेमाची तीच मुरती ।
लाव थोडासा जिव तिजला
करील जिवनाची तुझ्या पुरती ।
Sanjay R.