Monday, May 29, 2017

" मस्ती गोंधळ सारच सरलं "

लहान असतांना आम्ही
काय चालायची मस्ती ।
धांगड धिंगा मारापीटी
आरडा ओरड नुसती ।

कधी चाले कंचे गोट्या
कधी चाले विटी दांडु ।
लपाछपी धापा धुपी
तर कधी होइ बॅट चेंडु ।

शुर विरांची लढाइ चाले
घेउन हाती स्केल छत्ते ।
उन्हात आईचा नकार येता
घरातच चाले कॅरम पत्ते ।

मस्ती गोंधळ सारच सरलं
मोबाइल वरती खेळ आता ।
अभ्यास पुस्तक जाड झाले
नाही उरला वेळ आता  ।
Sanjay R.


No comments: