Wednesday, May 17, 2017

" कोण मी कुणाची आई "

कोण मी कुणाची आई
मला तर आता कुणीच नाही ।

दोन मुलांना देउनी जन्म
जपले तयासी राई राई ।

पंख पसरुनी झेप घेता
उरले पदरी काहीच नाही ।

जिव छोटासा कराया मोठा
हसणे रडणे  कळले नाही ।

बाळ तानुला निजण्यासाठी
रात्री सरल्या करीत गाई ।

तहान भुकेचे सारेच केले
स्वप्न पाहुनी दिशा दाही ।

पै पै जोडुन शिक्षण केले
उतारवयाला न उरले काही ।

मोठ्ठा झाला लेक लाडका
गेला सोडुन बाप आई ।

वृद्धाश्रमही नाही नशीबी
काळजी आमची कोण वाही ।

अंत घटिका मोजतो देवा
ठेउनी माथा  तुझ्या पायी ।
Sanjay R.

No comments: