कविता करणे
हा माझा छंद ।
त्यातच होतं
मन माझं बेधुंद ।
व्यक्त होतात कधी
मनातले भाव ।
कधी बघतो मी
माझं कल्पनेतलं गाव ।
खुप मिळाले मज
जिवा भावाचे मित्र ।
नाहीच संपणार आता
कवितेा लिखाणाचे सत्र ।
Sanjay R.
कविता करणे
हा माझा छंद ।
त्यातच होतं
मन माझं बेधुंद ।
व्यक्त होतात कधी
मनातले भाव ।
कधी बघतो मी
माझं कल्पनेतलं गाव ।
खुप मिळाले मज
जिवा भावाचे मित्र ।
नाहीच संपणार आता
कवितेा लिखाणाचे सत्र ।
Sanjay R.
कोण मी कुणाची आई
मला तर आता कुणीच नाही ।
दोन मुलांना देउनी जन्म
जपले तयासी राई राई ।
पंख पसरुनी झेप घेता
उरले पदरी काहीच नाही ।
जिव छोटासा कराया मोठा
हसणे रडणे कळले नाही ।
बाळ तानुला निजण्यासाठी
रात्री सरल्या करीत गाई ।
तहान भुकेचे सारेच केले
स्वप्न पाहुनी दिशा दाही ।
पै पै जोडुन शिक्षण केले
उतारवयाला न उरले काही ।
मोठ्ठा झाला लेक लाडका
गेला सोडुन बाप आई ।
वृद्धाश्रमही नाही नशीबी
काळजी आमची कोण वाही ।
अंत घटिका मोजतो देवा
ठेउनी माथा तुझ्या पायी ।
Sanjay R.
नाजुक कळिचे
एक फुल व्हावे ।
प्रत्येक पाकळीने
सु गंधीत व्हावे ।
फुल पाखराने
खुप फुलावे ।
कणा कण तयातुन
मधु रस प्यवे ।
गुणगुण करुणी
गित गावे ।
आनंदात जणु
हरवुन जावे ।
फुल गुलाबी
मी पण व्हावे ।
क्षण दुःखाचे
काढुन घ्यावे ।
स्वप्न सुखाचे
पुर्ण करावे ।
संपलो तरीही
किर्तीरुपे उरावे ।
Sanjay R
मत कर तु भरोसा
औरोके इकरार पर ।
प्यार तो प्यार है
मिट जाते हारकर ।
पुछ अपने दिलसे
उसीका इजहार कर ।
तडपते है लोग बहोत
एकबार तु प्यार कर ।
Sanjay R.
काळ्या कुट्ट अंधारात
दुरवर विज लखलखली ।
सोबत मेघांच्या नादानं
धरतीही थोडी गडगडली ।
घोंघावत धावला वारा
मुळं झाडांची थरथरली ।
टपोर्या थेंबाची होता बरसात
माती हलकेच मुसमुसली ।
थंड वार्याची चाहुल होता
उष्ण श्वासांची गती सरली ।
शांत निशांत सारे स्थिरावले
जाणीव सुखाची जी हसली ।
Sanjay R.