Monday, April 24, 2017

" रणरणतं उन्ह "

तळतळता सुर्य आणी
रणरणतं किती ते उन्ह ।
चटचट झोंबतात किरणं
निघतो माणुस भाजुन ।

शोधतो झाडाची सावली
वाटतं घ्यावं थोडं बसुन ।
पाणी पाणी जिव होतो
मन गेलं किती त्रासुन ।

बाहेर आगीच्या ज्वाळा
नकोच वाटतो उन्हाळा ।
घामासह रक्तही आटतं
येउ दे लवकर पावसाळा ।
Sanjay R.

Saturday, April 22, 2017

हास्य

डोळ्यात बघुन तुझ्या
चढते मजला नशा ।
चित होतो दिमाग
शोधतो तुज दस दिशा ।

मन होतं प्रसन्न
बघुन तुझं हास्य ।
बघत तुझ्या डोळ्यात
करायचं मज भाष्य ।
Sanjay R.

Wednesday, April 19, 2017

" ग्रिष्माची अदा "

ग्रिष्माची काय ती
अनोखी अदा ।
पहाट असते
रम्य सदा  ।
होताच दुपार
न भागे क्षुधा ।
सायंकाळ होताच
आईस क्रीम शोधा ।
रातराणीच्या गंधात
चंद्रावर चांदणी फिदा ।
Sanjay R.

Monday, April 17, 2017

" रास्ता और होगा "

जो आज है हमारा
वो कल न होगा ।
शायद आज से कल
खुबसुरत होगा ।
चलो चले दुर थोडा
रास्ता आगे और होगा ।
Sanjay R.

Saturday, April 15, 2017

" सुर संगीतके "

हो तुम कितनी
दुर फिर भी
लगता मुझे
हो पास मेरे ।
करता हु जब
याद तुम्हे
झिलमिलाते है
चांद सितारे ।
ओठोसे फिर
गुनगुन करते
ख्वाबो के ही
गीत प्यारे ।
तु मुझमे
मै तुझमे
संगीत के वो
सुर सारे ।
Sanjay R.