Tuesday, April 11, 2017

" आरसा "

काय पण नशीब
त्या आरशाचे
सदा असतेस तु
पुढ्यात त्याच्या ।
मलाही लागला
छंदच आता
शोधतो तुला
अंतरात त्याच्या ।
Sanjay R.

आनंद

डोळ्यात बघण्याचा
लागला मज छंद ।
नजरा नजर हेताच
मन होइ बेधुंद ।

चांदण्या रात्री आकाशी
प्रकाश चंद्राचा मंद ।
मनात विचारांचे चाले
वेगळेच एक द्वंद ।

झेलतो ओझे आठवणींचे
उलगडतो एकेक बंध ।
स्वप्नांचा होतो भास
लुटतो तयात आनंद ।
Sanjay R.

Thursday, April 6, 2017

" दिवस चार "

मज हरवायचं नाही तुला
जिंकायचंही नाही मला
दोनच पावले चालुन
दिवस चार जगायचं मला ।

खुले खुले आसमान
आणी कंच हिरवं रान
त्यात पिवळे लाल गुलाब
सारे बघायचे आहे मला ।

सुगंध मोहक मोगर्याचा
बहार चमचम तारकांचा
आणी पुर्ण चंद्र पौर्णीमेचा
सोबत त्यात हसायचं मला ।
Sanjay R.

Wednesday, April 5, 2017

" गया वो जमाना "

गया वो जमाना
मौसम न रहा सुहाना
रोज नया बहाना
सुनना कभी सुनाना
आशीक बडा दिवाना
न खाना न पीना
बस प्यार लुटाना
गाना गुनगनाना
चाहत उनको पाना
दिल  अनजाना
हुवा फीर बेगाना
अब रोना रुलाना
और दुर चले जाना
Sanjay R.

Tuesday, April 4, 2017

" सुर्य झाला वेडा "

तापच होतोय थोडा
सुर्य झाला वेडा  ।
उन झोंबतं अंगाला
होते कीती पीडा ।
पाण्यासाठी वणवण
सगळाच झाला तिढा ।
हाहाकार माजेल आता
नाही घेतला धडा ।
थेंब थेंब वाचवु आता
उचलू या सारे विडा ।
Sanjay R.