Thursday, March 9, 2017

" माझे घर '

इमारती चढताहेत आकाशी वर
रहायला नाही आम्हा छोटेसे घर ।

तुटके फुटके नावाला छप्पर
भिजउन जाते पावसाची सर ।

नाहित भिंती झोपडी ही अधर
झुळकीनं वार्याच्या होते थर थर ।

दोन हात जागेत चललाय बसर
गरिबाच्या जगण्याची कुणास कदर ।

दिवस रात्र चालतो कष्टाचा नागर
तरी फाटकाच आहे साडीचा पदर ।

दोन हजार विस पर्यंत सार्यांना घर
लाउन बसलोय तिकडेच मी नजर
Sanjay R.

Wednesday, March 8, 2017

" आईचा तान्हा "

आईचं हेच मनोगत
मुलांसाठी काहिही ।
प्रेमापोटी करते सारे
अपेक्षाही मुळीच नाही ।

बाळ तिचा मोठ्ठा व्हावा
प्रभुचरणी एकच धावा ।
आनंदाने सोसते सारे
मनात नाही उजवा डावा ।

दिवसा मागुन दिवस जाता
मोठा होतो तिचा कान्हा ।
बळ पंखात येताच त्याचे
शोधते आई तिचा तान्हा ।
Sanjay R.

" जगत्दात्री मी "

" जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा "

कोण मी काय नाते तुजशी माझे
होउनी अर्धांगिणी जपते स्वप्न तुझे ।

कुणाची मी बहिण कुणाची माता
त्यागाची धरुनी मशाल जळते स्वताः ।

जगत्दात्री मी या धरेची गाथा
सोसते दुःख सारे पदरात व्यथा ।

आसवांच्या सागरातले मी कमळ
झेलुनी मार लाटांचा आहे अढळ ।
Sanjay R.

Monday, March 6, 2017

" फुलोरा "

​मनातल्या चार ओळी
दोन तुझ्या दोन माझ्या ।
आठवण होताच तुझी
फुलतो मनी पिसारा माझ्या ।
बघायचे मज आहे सदा
हास्याचे फुलोरा गाली तुझ्या ।
Sanjay R.

" दुर दुर जाउ "

चला चला आता
दुर दुर जाउ या ।
सोबत कवितेच्या
तिकडेच राहु या ।
गीत आनंदाचं
सोबत गाउ या ।
चादण्या रात्री
चंद्रात न्हाउ या ।
दुड दुड दुड दुड
हलकेच धाउ या ।
मिटुन डोळे हलकेच
स्वप्न मनीचे पाहु या ।
Sanjay R.