थोडं थोडं रुसायचं
आणी गोड हसायचं ।
हळव्या मनाला मात्र
खुप खुप जपायचं ।
जिवन आहे अनमोल
आनंदात छान जगायचं ।
दुःख असतात क्षणीक
दुर त्यांना सारायचं ।
सुख दुःख सखे सोबती
सोबत त्यांच्या चालायचं ।
Sanjay R.
Thursday, February 2, 2017
" थोडच रुसायचं "
Wednesday, February 1, 2017
" बळीराजाची व्यथा "
बळिराजा तु नाही तुज
उन्हा तान्हाची फिकीर ।
पान्या पावसाशी तुझी
किती जुळली लकीर ।
उपसतो कष्ट किती
होतोस तु अधीर ।
पावसाच्या वाटेवर
नजर लागे भीर भीर ।
वेडावती ढग तुला
कधी होतो मग उशीर ।
कधी होतो पुर पाणी
तुटतो जिवाचा धीर ।
निसर्गाच्या हाती सारे
सोसतो सारे तीर ।
चंदना वाणी झिजतो
गड्या तुच शुर वीर ।
चिंता वाहतो दुनीयेची
अर्धपोटी तुझा संसार ।
लेतो शिउन फाटके
परी दिव्याखाली अंधार ।
Sanjay R.
Tuesday, January 31, 2017
" झुळ झुळ वारा "
झुळ झुळ वाहे गार वारा
एक माझा तुला इशारा ।
जिकडे तिकडे आहे पसारा
त्यातुन लुकलुकतो एकच तारा ।
Sanjay R.
Tuesday, January 24, 2017
" शब्दांचे मोल "
हलतात ओठ त्यांचे
शब्द का झालेत अबोल ।
मनात खुप बोलायचे
परी शब्द अंतरात खोल ।
निरर्थक जो बोले त्यासी
नकळे शब्दांचे मोल ।
शब्द शब्दात फिरवुनी
साधी स्वार्थाचा गोल ।
घेउनी आधार शब्दांचा
घालवी सर्वस्वाचा तोल ।
गोड मधुर वाणी ज्यांची
शब्द तयांचे अनमोल ।
Sanjay R.