जाउ या चला
कवितेच्या गावात ।
खुप सारं आहे
लिहायला मनात ।
तरंग उठतात
ह्रुदयाच्या खोलात ।
सरसावतात शब्द
उतरायला कागदात ।
दुःखाचे क्षण
भिजुन जाइ आसवात ।
मात्र आनंद कसा
मावेना गगनात ।
Sanjay R.
Thursday, December 8, 2016
" कवितेच्या गावात "
" एकच आहे वाट "
मनातल्या स्वप्नांची बघ
एकच आहे वाट ।
चढ उतार वेड्या वाकड्या
वळणांचा आहे हा घाट ।
निसर्गाची किमया न्यारी
जंगलं आहेत दाट ।
रम्य किती मनोहारो
झुळ झुळ वाहतात पाट ।
आनंद उत्साह सुख शांती
सुंदर किती हा थाट ।
समुद्र इतका विशाल इथे
सुख दुःखाची येते लाट ।
जिवनाची ही हिच तर्हा
रात्री नंतर होते पहाट ।
Sanjay R.
Wednesday, December 7, 2016
" पहाट "
चमकत होते चंद्र तारे
रात्र होती काजव्यांची ।
रातराणी देउन गेली
पाकळी दुर सुगंधाची ।
पहाट होताच अंगण न्हाले
किलबील किलबील पाखरांची ।
रम्य झाली धरा सारी
होताच बरसात किरणांची ।
Sanjay R.
Monday, December 5, 2016
" झाले वय माझे "
वय झाले हो आता
जगायचे मला अजुन ।
मनातलं खुप बाकी आहे
करायचं मला अजुन ।
लहनपणी खेळले खेळ
बाकी अजुन मनाचा मेळ ।
खळखळुन हसायचं
कधी हट्ट करुन रडायचं
थांबवाना थोडी वेळ ।
खुप आहे फिरायचं
मौज मस्तीत जगायचं ।
खाणं पीणं मैत्री दोस्ती
किती कीती हो उरलय ।
बघायची सारी दुनीया
घरातच सारं सरलय ।
थांबवाना थोडं वेळेला
आत्ताच तर जगणं धरलय ।
Sanjay R.