कुणास ठाउक का
वाटतं मला असच
खुप तुझ्याशी बोलावं ।
मनातलं गुज माझ्या
न सांगता तुला कळावं ।
दुर त्या आकाशात
घेउन हातात हात
सोबत तुझ्या पळावं ।
कधी मी तुला तर
कधी तु मला
हलकेच थोडं छळावं ।
घालवुन मग राग
मनानं प्रेमात वळावं ।
Sanjay R.
Tuesday, November 15, 2016
" मनातलं गुज "
" रजईची सोबत "
अशी ही सायंकाळ
आली घेउन गारवा ।
हवीशी वाटे उब
निशेला थोडे थांबवा ।
रजईची सोबत बघा
देइ मायेचा ओलावा ।
येयील घेउन स्वप्नांना
कळी आनंदाची खुलवा ।
Sanjay R.
Monday, November 14, 2016
" देइल का कोणी परत बालपण "
मोठा इतका मी झालो बघा
हरवले माझे ते बालपण ।
वर्षा मागुन गेली वर्ष
नाहीच उरलं काही पण ।
केव्हा सरलं कळलच नाही
हसणं खेळणं रुसणं रागावणं ।
आईचे लाड बाबांचा राग
शाळेची मस्ती मास्तरांची धास्ती ।
कधी अभ्यास टिफीन खास
मित्रांची मैत्री तर कधी कुस्ती ।
नको नको ते सारे करायचे
लपुन छपुन सिनेमे बघायचे ।
काढायची कधी मुलींची छेड
कधी मनाला लागायचे वेड ।
संपले सारे उरल्या आठवणी
बालपण परत देइल का कोणी ।
Sanjay R.
Tuesday, November 8, 2016
" रुप तुझे "
मोकळे केस तुझे
वेडावतात मज ।
डोळ्यातला भाव
करी बेधुंद मज ।
गोड गुलाबी ओठ
हवे हवे वाटे मज ।
बघुन रुप तुझे
तुझाच व्हायचे मज ।
Sanjay R.
Monday, November 7, 2016
" निवांत "
नाही मजला ठाव
झालेत कीती सांगु
मनावर माझ्या घाव ।
नको वाटतं सारं
दुर त्या काठावर
उभी जशी एक नाव ।
चिंतेचे सावट मनी
दिसेलका माझा गाव ।
आठवणींचा उभार
काढ डोहातुन मज
देवा तु तरी पाव ।
नको आता एकांत
मन झाले अशांत ।
आहे एकच खंत
नको संपवु सारे
कर मज निवांत ।
Sanjay R.