Sunday, October 16, 2016

" कोजागीरी "

ठेवलं आहे हो
दुध उकळायला ।
थांबायचं आता थोडं
चंद्र दुधात बघायला ।
अम्रुताचा होइल वर्षाव
घेउ मग प्यायला ।
नाही ना धरवत धीर
या सारे भुलाबाइची
गाणी गायला ।
Sanjay R.

काट्यात फुललास
गुलाबाच्या फुला ।
मन घेइ माझे
आनंदाचा झुला ।
Sanjay R.




Saturday, October 15, 2016

" माळ भावनांची "

निरागस चेहरा तुझा
मनास माझ्या भावला ।
नजरेत जादु अशी
बाण ह्रुदयी लावला ।
एक एक शब्द तुझा
कानास माझ्या गावला ।
ओठही झाले आतुर
ओठांनाच प्यायला ।
गालावरची लाली तुझ्या
खुणावते बघ मला  ।
केस काळे पुढ्यात आले
मनास माझ्या गुंतायला ।
गुरफटलो मी तुझ्यात आता
सांगु कसा मी कुणाला ।
जाण तु भाव मनाचे
माळ भावनांची ओवायला ।
Sanjay R.

Friday, October 14, 2016

" कल्पनेत मी "

बघुन तुझ्या डोळ्यात
मलाच मी विसरलो ।
ठेउन तुज ह्रुदयात
तुझ्यात मी हरवलो ।
हवे मज क्षण तुझे
कल्पनेत मी विसावलो ।
तु आणी मी सांगतो तुज
अंतरंगात स्थिरावलो ।
Sanjay R.

Thursday, October 13, 2016

" तुम यादोमे सनम "

आपकी हर अदापे
मर मीटे थे हम ।
हुवे थे आपके जादा
और खुदके कम ।
न थे कुछ सपने
न थे कोइ गम ।
ओठोपे मुस्कुराहट
आखे कुछ नम ।
अब भी वही चाहत
तुम यादोमे सनम ।
Sanjay R.

Wednesday, October 12, 2016

* तरंग "

तुझ्यासारखं कुणी
जिवनात असावं
मीही मग हट्टानं
हलकेच रुसावं ।
तुनेही मला हलकेच
कुशीत तुझ्या घ्यावं ।
राग आणी लोभ सारा
अंतरात विळुन जावं ।
Sanjay R.