Thursday, August 25, 2016

" रंगले गोकुळ "

होउ दे एक रंगांची कवीता
उधळु दे मनात सुरेख सवीता ।
प्रत्येक रंगाची अलग सरीता
मिळुन होते सुरेख सुचीता ।
रंगात रंगले गोकुळ आता
हरी राधेशी रंग खेळता ।
Sanjay R.

दुर आकाशात
चमकले तारे ।
घेतले उचलुन
मुठभर वारे ।
रुसुन बसले
दोन सितारे ।
चंद्र सुर्याचे
रंगच न्यारे ।
सोबत त्यांच्या
नभोमंडळ सारे ।
अमावसेच्या रात्री
चालती इशारे ।
असले जरी
लाख पहारे ।
Sanjay R.


Sunday, August 21, 2016

" भासे अप्सरा "

घेउन पुढे  काळ्या
केसांच्या बटा ।
ओठी खुलल्या
गुल्लाबी  छटा ।

गालात झळकते
हास्याची घटा ।
नेत्रात विसावतो
आनंद मोठा ।

डोकावतो तुझ्यात
मी सारखा असा ।
लावलेस वेड मज
रोकले बघ श्वासा ।

काय वर्णु सांग तुज
भासे मज अप्सरा ।
लागली ओढ मना
शोधतो जरा जरा ।
Sanjay R.

" गुलाबी छटा "

घट्ट या मैत्रीच्या
आपल्या गाठी ।
एक फुल गुलाबाचे
तुझ्याचसाठी ।।

गुलाब मोगरा
जास्वंद चाफा ।
तुझ्यासाठी एक
गोड गोड पापा ।।

गोड हास्य तुझ्या
झळकले गाली ।
गुलाबी छटांची
ओठावर लाली ।।
Sanjay R.

Thursday, August 18, 2016

" ढग काळा "

बघता बघता
भरले आभाळ
लक्षणं पावसाची
दिसतात पुन्हा ।

येताच वारा
गेले उडुन सारे
नक्षत्राचा खेळ
आहेच हा जुना ।

कधी गरजतो
कधी बरसतो
वाटेकरी आसवांचा
काय त्याचा गुन्हा ।

शुभ्र आकाशी
ढग निळा काळा
भासे एकाकी
कसा सुना सुना ।
Sanjay R.

Wednesday, August 17, 2016

" विचारांच काहुर "

विचारांचं काहुर
मनात जेव्हा उठतं ।
बंद होतात दारं
तनही अशांत होतं ।
विचारांच चक्र
जोरात मग धावतं ।
मिटताच डोळे घट्ट
क्षणात सारं विसावतं ।
घेता शांत चित्तानं
हळुच छान सुखावतं ।
कपरान कोपरा मनाचा
प्रफुल्लीत झाल्याचं जाणवतं ।
ध्यानाची महीमाच अशी
जिवनात आनंद डोकावतो ।
Sanjay R.