सोडुन कुणीच जात नाही
सगळे असतात धरुन ।
नसेल विश्वास तर
पहा एकदा मरुन ।
यमाचा दरबार मोठा
या थोडे फिरुन ।
जिवन तर रोजचेच आहे
जाउन या थोडे
हवा पालट करुन ।
सांगतात लोकं
थाट अजब आहे
पाप पुण्याचा हिशोब
देतात तीथे करुन ।
इथलं इथच सारं
द्यावं लागतं भरुन ।
कर्म करा चांगले
मिळेल फळ भर भरुन
जिंकायचाच आहे स्वर्ग
राहु तीथं स्मरुन ।
Sanjay R.
Friday, July 29, 2016
" जिंकु या स्वर्ग "
Wednesday, July 27, 2016
Tuesday, July 26, 2016
" स्वच्छ भारत देश महान "
आव्हान करी
पंत प्रधान ।
लागले कामी
मोठे लहान ।
कचरा कुंडी
सरली घाण ।
नद्या नाले
निर्मळ छान ।
स्वच्छ भारत
आमची शान ।
माझा भारत
देश महान ।
Sanjay R.
Sunday, July 24, 2016
" उमलली एक कळी "
उमलली चेहर्यावर
हास्स्याची एक कळी ।
खुलुन दिसते बघ
तुझ्या गालावर खळी ।
हिच तर अदा तुझी
वेडावते मला ।
भिरभिरते नजर माझी
शोधते फक्त तुला ।
बघताच रुप तुझे
होती जागे तराणे ।
प्रित तुझी माझी
आणी गुंजते प्रेमगाणे ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)